Job Market News: कोरोनाच्या हाहाकारातही IT क्षेत्राला झळाळी; मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करणार

 कोरोना संकटात बेरोजगारी वाढत आहे, मात्र आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या वाढत आहे.

Updated: Apr 20, 2021, 01:13 PM IST
Job Market News: कोरोनाच्या हाहाकारातही IT क्षेत्राला झळाळी; मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करणार title=
representative image

मुंबई:  कोरोना संकटात बेरोजगारी वाढत आहे, मात्र आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या वाढत आहे. 2020 नंतर 2021 मध्येही आयटी क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. एकीकडे कोरोना संकटात देश लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तर दुसरीकडे देशातील टॉप आयटी कंपन्या बंपर भरती करीत आहेत.

देशातील टॉप आयटी कंपन्यांमध्ये बंपर भरती

नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांमध्ये सर्वांत मोठी आयटी कंपनी टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा सामावेश आहे. कोरोनाच्या अशा परिस्थितीही कंपन्यांना अशा उमेदवारांची गरज आहे. जे त्यांच्या ग्राहकांना उत्तम सेवा देऊ शकतील.

डिजिटल ग्राहकांचा वाढता बाजार

बहुतांष कंपन्या डिजिटल ग्राहकांवर जोर देत आहेत. टीसीएस कँपसच्या माध्यमांतून 40 हजार उमेदवारांची भरती करण्याच्या तयारीत आहे.

तर इन्फोसिसदेखील 25000 उमेदवारांच्या भरतीसाठी तयार आहे. विप्रोच्या बाबतीत स्पष्ट खुलासा होऊ शकलेला नाही. परंतु गेल्यावर्षी पेक्षा जास्त उमेदवारांची भरती करणार आहे.

याव्यतिरिक्त एचसीएल टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रासारख्या दिग्गज कंपन्यादेखील भरती करणार आहे. त्यामुळे येत्या काळात कोणत्याही क्षेत्रात घसरण होईल परंतु आयटी क्षेत्र वाढतच राहिल असेच म्हणता येईल.