Omicron Sub-Variants : कोरोनाचा (Corona) जोर ओसरला असला तरी कोरोना कायमचा गेलेला नाही. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घ्यायलाच हवी. करोनाचं आव्हान अजूनही संपलेलं नाही. भारतासह अनेक देशांमध्ये बीएफ.7 ओमायक्रॉन (BF.7 Omicron), बीक्यू.1 (BQ.1), बीक्यू.1.1 (BQ.1.1) आणि बीए 2.2.3.20 (BA 2.2.3.20) हे कोरोना ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएं पसरत आहे. त्यामुळे हिवाळ्यात नवी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
या व्हेरिएंट्सची लक्षणं ही फार गंभीर नाहीत. मात्र या व्हेरिएंट्सचं संक्रमण वेगाने होतंय. या व्हेरिएंट्सच्या 2 गोष्टी फार चिंताजनक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हा व्हेरिएंट रोगप्रतिकार शक्तीलाही जुमानत नाही. तर दुसरा मुद्दा म्हणजे कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही या व्हेरिएंटची लागण होत आहे.
आम्ही काही लक्षणांबाबत सांगणार आहोत. जर तुम्ही कोरोनाचे दोन्ही डोस घेतले असतील आणि त्यानंतरही तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर तातडीने कोरोना टेस्ट करायला हवी.
Zoe Covid Study App नुसार, ज्याांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये नाकातून पाणी येणं हे लक्षण असू शकतं. लसीकरण केलेल्यांमध्ये हे लक्षण सामान्य असल्याचं मानले जातं. कोविड स्टडी अॅपच्या आकडेवारीनुसार 83 टक्के लोकांमध्ये हे लक्षण दिसून आलंय.
नाकातून पाणी येणं ही सर्दी खोकल्याचं सामन्य लक्षण आहे. मग हे लक्षण कोरोनाचंच आहे, हे कसं समजणार, असा प्रश्न सर्वसामांन्यांना पडलाय. कोविड स्टडी अॅपनुसार, नाकातून पाणी येण्याचं कारण हे कोरोना असू शकतं, हे त्यावेळी कोरोनाचा प्रसार किती होतो यावर ते अवलंबून असेल. जेव्हा कोरोनाचं प्रमाण जास्त असते, तेव्हा कोविड संसर्गामुळे नाक वाहण्याची शक्यता जास्त असते.
तसेच याशिवाय घसा खवखवणे, नाक चोंदणे, सतत खोकला किंवा डोकेदुखी ही देखील कोरोनाची लक्षणे असू शकतात. तसंच सतत शिंकत असाल तरीही सतर्क रहा, कारण हे देखील कोरोनाचे लक्षणं असू शकतात.