Omicron ची तिसरी लाट निश्चित! 'या' महिन्यात उद्रेक

भारतात ओमायक्रॉन संक्रमित लोकांची संख्या 126 वर 

Updated: Dec 19, 2021, 07:53 AM IST
Omicron ची तिसरी लाट निश्चित! 'या' महिन्यात उद्रेक  title=

मुंबई :  कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार असलेल्या ओमायक्रॉनचा धोका जगभरात पसरत आहे. दरम्यान, नॅशनल कोविड सुपरमॉडेल पॅनलने अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव शिखरावर असेल. ओमायक्रॉनमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे.

भारतात दररोज सुमारे 7 ते साडेसात हजार कोरोना व्हायरसचे रुग्ण येत आहेत. ही प्रकरणे डेल्टा प्रकारातील आहेत. पण लवकरच ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंटची जागा घेईल.

नॅशनल कोविड-19 सुपरमॉडेल कमिटीचे प्रमुख विद्यासागर म्हणाले की, ओमायक्रॉनमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल पण ती दुसऱ्या लाटेपेक्षा कमकुवत असेल. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतातील बहुतांश लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार हे निश्चित असले तरी.

विद्यासागर हे IIT हैदराबादमध्ये प्राध्यापक आहेत. ते म्हणाले की, दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत दररोज जास्त केसेस येतील. खरेतर, फ्रंटलाइन कामगारांव्यतिरिक्त, इतर भारतीय नागरिकांना 1 मार्च 2020 पासून लसीकरण करणे सुरू झाले.

जेव्हा डेल्टा प्रकार भारतात झपाट्याने पसरला तेव्हा बहुतेक भारतीयांना लसीकरण करण्यात आले नव्हते, परंतु यावेळी तसे होणार नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आम्ही आमची क्षमता वाढवली आहे, त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करणे पूर्वीपेक्षा सोपे आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने संपूर्ण जगाला कोरोनाच्या नवीन प्रकाराबद्दल चेतावणी दिली आहे, की दीड ते तीन दिवसांत ओमायक्रॉनची प्रकरणे दुप्पट होत आहेत.

कोरोनाचा हा नवीन प्रकार जवळपास 90 देशांमध्ये पोहोचला असून भारतात संक्रमित लोकांची संख्या 126 वर पोहोचली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग हळूहळू देशातील 11 राज्यांमध्ये पसरला आहे.

देशात दररोज या नवीन प्रकाराची लागण झालेल्या लोकांची पुष्टी होत आहे.