Omicron Cases In India: देशात 100 वर पोहोचली रुग्णांची संख्या, चिंता वाढली

आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकाराबाबत माहिती दिली आहे.

Updated: Dec 17, 2021, 06:38 PM IST
Omicron Cases In India: देशात 100 वर पोहोचली रुग्णांची संख्या, चिंता वाढली title=

नवी दिल्ली : देशातील ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 100 वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकाराबाबत माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशात ओमायक्रॉनची एकूण प्रकरणे 101 वर गेली आहेत.

माहिती देताना ते म्हणाले की, जगभरातील 91 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा प्रसार डेल्टा प्रकारापेक्षा वेगाने होत आहे. असे मानले जाते की समुदाय पसरलेल्या भागात, ओमिक्रॉनची प्रकरणे डेल्टा प्रकारापेक्षा जास्त येऊ शकतात.

11 राज्यांमध्ये ओमायक्रॉनची 101 प्रकरणे आहेत

महाराष्ट्र - 32

दिल्ली- 22

राजस्थान - 17

कर्नाटक - 8

तेलंगणा - 8

केरळ - 5

गुजरात - 5

आंध्र प्रदेश- 1

तामिळनाडू - 1

चंदीगड - 1

पश्चिम बंगाल - 1