मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून देशात एक मुद्दा खूप चर्चेत आहे, तो म्हणजे ज्ञानवापी मंदिर होती की मशिद'? वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. ज्ञानवापी मशिदीतील तीन दिवसांच्या सर्वेक्षणानंतर, हिंदू बाजूने असा दावा केला आहे की मशिदीमध्ये शिवलिंग सापडले आहे आणि मुस्लिम बाजूचे म्हणणे आहे की ते वजूखानामधील कारंजे आहे.
पण ज्ञानवापी मशिदीशिवाय देशात अशा अनेक मशिदी आहेत, ज्यांच्याबद्दल असा दावा केला जातो की, तिथे एकेकाळी मंदिरे किंवा हिंदू धर्माशी संबंधित धार्मिक वास्तू होत्या. अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांवर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूचे लोक दावा करतात. यातील अनेक प्रकरणे आजही न्यायालयात सुरू आहेत. तर आम्ही तुम्हाला ज्ञानवापी मशिद व्यतिरिक्त देशातील अशा पाच मशिदींबाबत सांगणार आहोत, ज्या मुघल शासकांनी किंवा परदेशी मंदिर पाडून बांधल्या.
1.काशी विश्वनाथ - ज्ञानवापी मशीद (वाराणसी)
वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर 11 व्या शतकात राजा हरिश्चंद्र यांनी बांधले होते. महंमद घोरीपासून सुलतान महमूद शाह अशा अनेक राज्यकर्त्यांनी वेळोवेळी हे मंदिर मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.
असे म्हटले जाते की, 18 एप्रिल 1669 रोजी मुघल शासक औरंगजेबने मंदिर पाडले आणि तेथे ज्ञानवापी मशीद बांधली, ज्याबद्दल आजही वाद सुरू आहे. काशीतील विश्वनाथ मंदिर, जे आज तुम्ही पाहता, ते इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी 1780 मध्ये बांधले होते. ज्ञानवापी मशीद मंदिर परिसरातून हटवण्याची पहिली याचिका 1991 मध्ये दाखल करण्यात आली होती.
2. श्री कृष्ण जन्मभूमी- शाही ईदगाह (मथुरा)
मथुरा हे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असून याच जन्मस्थानाच्या अर्ध्या भागावर शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली आहे. मथुरेतील पहिले केशवनाथ मंदिर 80-57 ईसापूर्व बांधले गेले. असे मानले जाते की औरंगजेबाने 1660 मध्ये मथुरेतील श्री कृष्णाच्या जन्मस्थानावरील प्राचीन केशवनाथ मंदिर पाडून ईदगाह बांधली. सध्या हे प्रकरण न्यायालयातही प्रलंबित आहे.
3. चिका देवी मंदिर-बिजा मंडल मशीद (विदिशा, मध्य प्रदेश)
मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील बिजा मंडळाबाबतही वाद आहे. बिजा मंडल मशीद परमार राजांनी बांधली असे म्हणतात आणि येथे त्यांनी चर्चिका देवी मंदिर 10-11 व्या शतकात बांधले. 1658 ते 1707 मध्ये औरंगजेबाने या बिजा मंडलावर तोफांनी हल्ला केला आणि त्यानंतर मंदिराऐवजी बिजा मंडल मशीद बांधली. नंतर त्याचे नाव बदलून बिजा मंडल मशिद ठेवण्यात आले. बिजा मंडलावर आता हिंदू आणि मुस्लिम दोघांचाही दावा आहे.
या ठिकाणी आजही जे खांब आहेत त्यांच्या शिलालेखांवरून असे समजते की पूर्वी येथे चर्चिका देवी म्हणून ओळखले जाणारे विजया देवीचे मंदिर होते.
4. भद्रकाली मंदिर - जामा मशीद (अहमदाबाद)
कर्णावती शहर जे सध्या अहमदाबाद म्हणून ओळखले जाते. 14 व्या शतकात येथील भद्रकाली मंदिर मुस्लिम आक्रमकांनी उद्ध्वस्त केल्याचे सांगितले जाते. भद्रकाली मंदिर राजपूत परमार राजांनी बांधले होते. जामा मशीद 1424 मध्ये अहमद शाह प्रथम याने भद्रकाली येथे बांधली होती. जामा मशिदीचे खांब हिंदू मंदिरांच्या शैलीत बांधलेले आहेत.
5. आदिनाथ मंदिर-आदिना मशिद (पश्चिम बंगाल)
आदिना मशिद पश्चिम बंगालमधील मालदा येथे आहे. ती 1396 मध्ये सुलतान सिकंदर शाहने बांधली होती. आदिना मशिदीचे ठिकाण हे शिवाचे प्राचीन आदिनाथ मंदिर असल्याचे सांगितले जाते. आदिना मशिदीच्या अनेक भागांमध्ये हिंदू मंदिरांचे कोरीवकाम पाहायला मिळते.
6. भोजशाला-कमल मौला मशिद (धार, मध्य प्रदेश)
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील कमाल मौला मशीदही वादात सापडली आहे. हिंदू पक्षाचा दावा आहे की कमल मौला मशिदीऐवजी पूर्वी माता सरस्वतीचे प्राचीन मंदिर भोजशाळा असायचे. भोजशाला मंदिर 1034 मध्ये हिंदू राजा भोज याने बांधले होते असे म्हणतात.
प्रथम या मंदिरावर 1305 मध्ये अलाउद्दीन खिलजीने हल्ला केला, नंतर सम्राट दिलावर खानने ते उद्ध्वस्त केले. मग महमूद शाहने भोजशाळेवर हल्ला करून येथे कमाल मौलानाची कबर बनवली. हिंदू दर मंगळवारी या ठिकाणी पूजा करतात आणि वसंत पंचमीला आणि मुस्लिम शुक्रवारी नमाज अदा करतात.