राहुल गांधींच्या इफ्तार पार्टीचं प्रणब मुखर्जींना आमंत्रण नाही

प्रणब मुखर्जींना आमंत्रण का नाही....?

Updated: Jun 11, 2018, 02:54 PM IST
राहुल गांधींच्या इफ्तार पार्टीचं प्रणब मुखर्जींना आमंत्रण नाही title=

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी नागपुरात आरएसएसच्या कार्यालयात हजेरी लावल्याने काँग्रेस नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्ष अजूनही त्यांच्यावर नाराज दिसतो आहे. कारण राहुल गांधी यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीत प्रणब मुखर्जी यांना आमंत्रणचं दिलं गेलं नाही. 13 जूनला काँग्रेसने इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये याचं आयोजन करण्यात आलं आहे. पण यासाठी काँग्रेसचे नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. म्हत्त्वाचं म्हणजे काँग्रेसने या पार्टीत माजी उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांना देखील अजून आमंत्रण दिलेलं नाही.

काँग्रेसने 2 वर्षानंतर इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. पण या पार्टीला प्रणब मुखर्जी यांना आमंत्रण नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसने या पार्टीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील आमंत्रण दिलेलं नाही.