जम्मू-काश्मीरच्या राजकीय पेचात काँग्रेसचा 'दे धक्का'

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपनं मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीचा पाठिंबा काढला आहे. 

Updated: Jun 19, 2018, 03:41 PM IST
जम्मू-काश्मीरच्या राजकीय पेचात काँग्रेसचा 'दे धक्का' title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपनं मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीचा पाठिंबा काढला आहे. भाजपनं पाठिंबा काढल्यामुळे जम्मू-काश्मीरमधलं सरकार अल्पमतात आलं आहे. भाजपनं पीडीपीचा पाठिंबा काढल्यानंतर काँग्रेस काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलं होतं. पण पीडीपीसोबत युती करण्याचा प्रश्नच नसल्याचं काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसच्या या भूमिकेमुळे आता जम्मू काश्मीरमध्ये सरकार बनण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे. भ्रष्टाचारापासून वाचण्यासाठी भाजप आता कारणं देत आहे. भाजप त्यांची जबाबदारी झटकू शकत नाही, अशी टीका गुलामनबी आझाद यांनी केली आहे.

एकूण 87 जागा असलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेत 44 हा बहुमताचा आकडा आहे. पीडीपीचे 28 आणि भाजपचे 25 आमदार मिळून 2014 साली सरकार स्थापन झालं होतं. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला 15, काँग्रेसला 12, इतर 5 आणि अपक्षांना 3 जागा मिळाल्या होत्या.