निर्भया प्रकरणी पवन कुमार गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

निर्भयाच्या चारही दोषींचा फाशीचा मार्ग मोकळा...

Updated: Mar 4, 2020, 02:11 PM IST
निर्भया प्रकरणी पवन कुमार गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील पवन कुमार गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. त्यामुळे आता निर्भयाच्या चारही दोषींचा फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

निर्भया सामूहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा आरोपी पवन गुप्ता याची बचाव याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळ्याने त्याची फाशीची शिक्षा कायम आहे. फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.

निर्भया प्रकरणातील दोषींना ३ मार्च रोजी फाशी दिली जाणार होती. मात्र पटीयाला कोर्टाने ३ मार्च रोजी फाशी देण्यात येणार नसल्याचं २ मार्च रोजी सांगितलं. याप्रकरणी निर्भयाच्या आईने उद्वीग्न प्रतिक्रिया देत, त्यांना फाशी तर द्यावीच लागेल. मी हार मानणार नाही असं म्हटलं होतं.