नवी दिल्ली : रेल्वे कर्मचाऱ्यांचे (Railway Staff) कामकाज आता दोन शिफ्टमध्ये (work in 2 shifts) चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात नवीन रेल्वेमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर काही तासात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railways Minister Ashwini Vaishnaw) यांनी त्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांना दोन शिफ्टमध्ये काम करण्याचे आदेश दिले.
रेल्वेमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने हा निर्णय घेतला आहे. सकाळी 7 ते रात्री 12 या वेळांमध्ये दोन शिफ्टमध्ये काम चालेले. सध्या हा आदेश केवळ रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आहे. (New rail minister orders officials, staffers in office to work in 2 shifts)
रेल्वे मंत्र्यांच्या या निर्णयानंतर आता रेल्वे कर्मचारी रात्री 12 पर्यंत काम करणार आहेत. त्यामुळे आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या जाणार आहेत. कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील, अशा या वेळा असणार आहेत. सकाळी 7 ते दुपारी4 पर्यंत पहिली शिफ्ट आणि दुपारी 3 ते रात्री 12 पर्यंत दुसरी शिफ्ट असणार आहे.
वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार घेतल्यानंतर म्हणाले होते, पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टीकोनातून रेल्वे एक महत्त्वाचा विभाग आहे. रेल्वेकडे पाहण्याची त्यांची (पंतप्रधान मोदींची) दृष्टी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणे हा आहे. प्रत्येकाला अर्थात सामान्य माणूस, शेतकरी, गरीब यांना रेल्वेचा लाभ मिळावा. त्या दृष्टीक्षेपासाठी मी काम करेन, असे वैष्णव म्हणाले.
दरम्यान, माजी आयएएस अधिकारी, वैष्णव यांना रेल्वेमंत्री, संप्रेषणमंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त केले गेले आहे. तर रेल्वे मंत्रालय पूर्वी पीयूष गोयल यांच्या अधिपत्याखाली होते. त्यांना आता वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे.