नवी दिल्ली : निर्भाया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी ठरलेल्या पवन कुमार गुप्ताची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहे. त्यामुळे आता निर्भयाच्या चारही मारेकऱ्यांना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज दुपारी 2 वाजता याबाबत सुनावणी होणार आहे.
पवन गुप्तानं दया याचिका केल्यामुळे ३ मार्चला देण्यात येणारी फाशी टळली होती. आता त्याची दया याचिका फेटाळल्यामुळे सर्वांना एकसाथ फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज दुपारी दोन वाजता दिल्लीच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: The four convicts have exhausted all legal remedies. I hope that a fresh death warrant will be issued by the court today. pic.twitter.com/wWLFT4E836
— ANI (@ANI) March 5, 2020
पवनची क्यूरेटिव याचिका सोमवारी फेटाळण्यात आली होती. यासोबतच या प्रकरणातील दोषींचं अपील, पूर्नविचार याचिका, क्यूरेटिव पेटिशन आणि दया याचिका या सगळ्यागोष्टी फेटाळण्यात आलं आहे. पटियाला न्यायालयाने 17 फेब्रुवारी रोजी चारही आरोपींना मुकेश कुमार सिंह, पवन, विनय आणि अक्षय कुमार यांचा 3 मार्च रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. पण आरोपी पवनची दया याचिका राष्ट्रपतींकडे होती. यामुळे ट्रायल कोर्टाकडून डेथ वॉरंट रद्द करण्यात आलं होतं.
निर्भया सामूहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा आरोपी पवन गुप्ता याची बचाव याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळ्याने त्याची फाशीची शिक्षा कायम आहे. फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.
निर्भया प्रकरणातील दोषींना ३ मार्च रोजी फाशी दिली जाणार होती. मात्र पटीयाला कोर्टाने ३ मार्च रोजी फाशी देण्यात येणार नसल्याचं २ मार्च रोजी सांगितलं. याप्रकरणी निर्भयाच्या आईने उद्वीग्न प्रतिक्रिया देत, त्यांना फाशी तर द्यावीच लागेल. मी हार मानणार नाही असं म्हटलं होतं.