मोदींच्या शपथविधीत पवारांना खरंच पाचव्या रांगेत स्थान? सत्य आलं समोर

पाचव्या रांगेत स्थान दिले म्हणून शरद पवार नाराज असल्याचे सांगितले गेले. पण आता यामागचे वेगळेच कारण समोर आले आहे. 

Updated: Jun 5, 2019, 05:16 PM IST
मोदींच्या शपथविधीत पवारांना खरंच पाचव्या रांगेत स्थान? सत्य आलं समोर title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथविधी 30 मेच्या संध्याकाळी राष्ट्रपती भवनात पार पडला. या भव्य सोहळ्यात देश-विदेशातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली आणि देशभरात चर्चेचा विषय झाला. पाचव्या रांगेत स्थान दिले म्हणून शरद पवार नाराज असल्याचे सांगितले गेले. पण आता यामागचे वेगळेच कारण समोर आले आहे. शरद पवारांच्या कार्यालयातून त्यांना चुकीची माहीती दिली गेली. प्रत्यक्षात पवारांना मिळालेली जागा ही पहिल्याच रांगेतील होती हे समोर येत आहे. 

शरद पवार यांना V रांगेतील पास दिला होता. परंतु V रांगेतील पास पाचव्या रांगेत असल्याची चुकीची माहिती पोहोचवली गेली. शरद पवार यांच्याच कार्यालयातून ही चुकीची माहिती पवारांना दिली गेली. त्यामुळे पवारांनी शपथविधीवर बहिष्कार घातला. शपथविधीकडे पाठ फिरवली. पण प्रत्यक्षात V रांग ही सर्वात पुढे होती. हा V म्हणजे रोमन पाच अंक असल्याचा समज झाला. आणि पाचवी रांग दिली गेल्याची माहीती पवारांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.