नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये आर्यन खान प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede Transferred) यांची बदली करण्यात आली आहे. वानखेडेंची चेन्नईत बदली करण्यात आली आहे. वानखेडे आता चेन्नईत डीजीटीएसमध्ये बदली करण्यात आली आहे. डीजीटीएस हे पद अडगळीचं असल्याचं म्हटलं जातं. (ncb former director sameer wankhede has been transferred to chennai)
वानखेडे यांची या 13 एप्रिलला त्यांच्या मूळ संवर्गातील केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळात बदली झाली. ड्रग प्रकरणी एनसीबीच्या आरोपपत्रात शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला क्लीन चिट दिल्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे.
आर्यनला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर केंद्र सरकारने कारवाईसाठी सज्ज झाली आहे. माजी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना केंद्र सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने शुक्रवारी कोर्टात 6000 पानांचे आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात आर्यनचे नाव नाही. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलाविरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे एनसीबीने म्हटलंय.
समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी आहेत. वानखेडे यांनी भारतीय महसूल सेवेत येण्याआधी 2006 मध्ये केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्येही (Central Police Organization) काम केलं होतं.