नवी दिल्ली : कोब्रा कमांडर राजेश्वर सिंह शनिवारी छत्तीसगड विजापूर जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी चकमकीनंतर बेपत्ता आहेत. राजेश्वर हे आपल्या ताब्यात असल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे. दरम्यान राजेश्वर सिंह यांच्या निरागस मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे. वडीलांनी लवकर घरी परत यावेत यासाठी ती ओरडत आहे. हरवलेल्या जवानचे नातेवाईकही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ छत्तीसगडमधील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे.
माओवाद्यांनी सोमवारी काही माध्यमांना बोलावले आणि बेपत्ता कमांडर त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा केला. राजेश्वरसिंग यांना नुकसान पोहोचवणार नसल्याचे त्यांनी म्हटले. पण त्यांच्या सुटकेसाठी काही अटी घातल्या आहेत. यानंतर राजेश्वरसिंग यांचे कुटुंबीय माध्यमांशी बोलले.
#Bijapur #NaxalAttack में बंधक बनाए गए जवान की बेटी की आवाज़ सुनकर मन भावुक हो गया.
परिवार के दर्द की हम सिर्फ कल्पना ही कर सकते हैं...
उनकी सुरक्षित वापसी के लिए हर संभव प्रयास किये जा रहे हैं. आपके पिताजी रक बहादुर योद्धा हैं बिटिया. आप भी उनकी तरह धैर्य और हिम्मत से काम लें... pic.twitter.com/8dwTw5xkj3— Dipanshu Kabra (@ipskabra) April 5, 2021
बेपत्ता कमांडरच्या पत्नीने पतीची सुरक्षित सुटका व्हावी यासाठी नक्षलवाद्यांची मागणी पूर्ण करण्याचे आवाहन केले. शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता मी माझ्या पतीबरोबर शेवटच्या वेळी संवाद साधला, असे पत्नीने सांगितले. ते म्हणाले होते की मी ऑपरेशनमध्ये आहे. मी स्वत: साठी जेवण पॅक करत आहे. मी शनिवारी ऑपरेशनमधून परत येऊन बोलेन असा त्यांच्याशी शेवटचा संवाद झाला होता.
शनिवारी रात्रीपासून त्यांना सतत फोन करतेय पण त्यांनी कॉल उचलत नाही. ते हरवलेल्या यादीमध्ये असल्याचे नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले. त्यानंतर आम्ही शोध मोहीम राबवित आहोत असे सीआरपीएफकडून कळाले. कोणतीही माहिती मिळताच आम्ही आपल्याला सांगू असे ते म्हणाले. पण ते नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याचे आता आम्हाला वृत्तवाहिन्यांद्वारे कळल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले.