नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने पकडले १३०० कोटींचे ड्रग्ज

 नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधळले आहे.

Updated: Dec 14, 2019, 03:34 PM IST
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने पकडले १३०० कोटींचे ड्रग्ज  title=

नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधळले आहे. यातून तब्बल १३०० कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. यातील १०० कोटींचे ड्रग्ज भारतात पकडले गेले. तर १२०० कोटी रुपयांचे ड्रग्ज ऑस्ट्रेलियामध्ये पकडण्यात आले. 

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने आणि काही एजंसीने संयुक्तरीत्या टाकलेल्या धाडीत इतक्या मोठ्या रक्कमेचे ड्रग्ज हाती आले आहेत. यातील ९ जणांना भारतातून अटक करण्यात आले.

९ जण ताब्यात 

मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्ज रॅकेटचे कनेक्शन दिल्ली-एनसीआर, पंजाब, उत्तराखंड, महाराष्ट्रपासून ते ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडोनेशिया, श्रीलंका आणि कोलंबिया पर्यंत पोहोचले आहे. ताब्यात घेतलेल्या ९ जणांपैकी ५ भारतीय, एक अमेरिकन, २ नायझेरियन आणि एक इंडोनिशयन नागरीक आहेत.