नवी दिल्ली : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे उद्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. राणे यांनी अमित शहांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती.
भाजपच्या कार्यकारणीची उद्या दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये राणेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गातल्या रुग्णालयाच्या उद्घाटनाचं निमंत्रण राणे अमित शहांना करणार असल्याचीही माहिती आहे.