अल्पवयीन मुलेही SIP करु शकतात का? जाणून घ्या नियम

Mutual Fund SIP:  18 वर्षांपेक्षा कमी वर्षाची मुले एसआयपी करु शकतात का? तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर तुमच्या शंकेचे निरसन करुया. 

Updated: Mar 1, 2024, 04:48 PM IST
अल्पवयीन मुलेही SIP करु शकतात का? जाणून घ्या नियम title=
Minor SIP Investment

Mutual Fund SIP: सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. यामध्ये म्युच्युअल फंड एसआयपीची चर्चा खूप जास्त आहे. बहुतांश लोक आपल्या पोर्टफोलिओमध्ये एसआयपीचा समावेश करतात. एसआयपीमध्ये जास्त काळात मोठा फंड तयार केला जाऊ शकतो. लॉंग टर्म एसआयपीमधअये 12 टक्के रिटर्न्स मिळतात. इतर कोणत्याही गुंतवणूक स्किमपेक्षा हा परतावा जास्त आहे. पण 18 वर्षांपेक्षा कमी वर्षाची मुले एसआयपी करु शकतात का? तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर तुमच्या शंकेचे निरसन करुया. 

अल्पवयीनांसाठी काय आहे नियम?

एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वय आणि गुंतवणुकीच्या रक्कमेचं कोणतं बंधन नसतं. यामध्ये तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल, तितका जास्त तुम्हाला फायदा होईल. तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुमच्या पालकांद्वारे ही सुरु करता येऊ शकेल. अशावेळी मुलगा किंवा मुलगी एकमेव होल्डर असेल. यामध्ये जॉइंट होल्डरची परवानगी नसेल. 

कागदत्रे

अल्पवयीन मुलाच्या नावे एसआयपी करताना मुलगा किंवा मुलीच्या वयाचा पुरावा तुम्हाला जोडावा लागेल. अल्पवयीनाचा जन्म दाखला, पासपोर्ट असे कोणतेतरी दस्तावेज जोडावे लागेल. पालकांचे कागदपत्रदेखील जोडणे महत्वाचे असते. 

व्यवहार थेट मुलांच्या नावे केला जाऊ शकतो पण तो पालकांच्या बॅंक अकाऊंटद्वारे करायचे असेल तर थर्ड पार्टी डिक्लरेशन फॉर्मदेखील जमा करावा लागेल. 

18 वर्षे पूर्ण झाल्यावर

हे सारे नियम अल्पवयीन असेपर्यंतच लागू राहतील. मुलांची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पालकांना एसआयपी थांबवावी लागेल. अल्पवयीन 18 वर्षे होण्याआधी यूनिट होल्डरला त्याच्या अधिकृत पत्त्यावर एक पत्र पाठवले जाईल. ज्यामध्ये एक अर्ज भरण्याबद्दल सांगितले जाईल.