छत्तीसगढच्या मुली 'टनाटन'; भाजप खासदाराची मुक्ताफळे

'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ७७ वर्षीय खासदारांनी महिला आणि मुंलींबद्धल मुक्ताफळे उधळली आहेत. छत्तीसगढच्या मुली 'टनाटन' असल्याचे या खासदार महोदयांचे म्हणणे आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 4, 2017, 08:15 AM IST
छत्तीसगढच्या मुली 'टनाटन'; भाजप खासदाराची मुक्ताफळे title=

नवी दिल्ली : 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ७७ वर्षीय खासदारांनी महिला आणि मुंलींबद्धल मुक्ताफळे उधळली आहेत. छत्तीसगढच्या मुली 'टनाटन' असल्याचे या खासदार महोदयांचे म्हणणे आहे.

बन्सीलाल महतो असे या खासदार महोदयांचे नाव असून, छत्तीसगढमधील कोरबा लोकसभा मतदार संघातून ते भाजपचे प्रतिनिधित्व करतात. गांधी जयंती निमित्त (२ ऑक्टोबर) आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेदरम्यान एका कार्यक्रमात ते बोलत होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना बंन्सीलाल यांची जीभ घसरली. ते म्हणाले, 'उत्तर प्रदेशच्या मुली टना-टन होत चालल्या आहेत.'

दरम्यान, बन्सीलाल महतोंच्या या विधानावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. कार्यक्रमात पुढे बोलताना बन्सीलाल म्हणाले, 'राज्याचे क्रीडामंत्री भैयालाल रजवाडे नेहमीच मला सांगत असतात की, आता मुंबई, कलकत्याच्या मुलींची गरज नाही. कोरबा आणि उर्वरीत छत्तीसगढच्या मुली टना-टन होत चालल्या आहेत.'

दरम्यान, बन्सीलाल यांनी मंत्री रजवाडे यांच्या नावाच संदर्भ दिल्यामुळे प्रसारमाध्यमांनी रजवाडे यांच्याकडे विचारणा केली असता, 'बंन्सीलाल यांनी असे विधान केले असेल तर, ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. माझ्या एखाद्या मागील संभाषणाचा संदर्भ त्यांनी चुकीच्या पद्धतीने वापरला असावा', असे मत व्यक्त केले.

दरम्यान, रजवाडे यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, रजवाडे यांनी मागे बोलताना एकदा आता मला मुंबई, कलकत्त्याच्या कलाकारांची आवश्यकता नाही. छत्तीसगडमधील मुली प्रतिभाशाली आणि अधिक योग्य असल्याचे म्हटले होते. बन्सीलाल महतो यांच्या विधानासी रजवाड़े यांचा काहीही संबंध नसल्याचेही या प्रवक्त्याने सांगितले.