आणखी एक MMS कांड! शिपाई बनवायचा हॉस्टेलमधल्या मुलींचे आंघोळ करतानाचे VIDEO

मोहाली एमएमएस प्रकरणानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे

Updated: Sep 29, 2022, 09:21 PM IST
आणखी एक MMS कांड! शिपाई बनवायचा हॉस्टेलमधल्या मुलींचे आंघोळ करतानाचे VIDEO title=

Crime News : मोहाली एमएमएस प्रकरणानंतर (Mohali MMS Case) आता उत्तर प्रदेशमध्येही (Uttar Pradesh) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधल्या एका हॉस्टेलमधील (Girls Hostel) मुलींनी हॉस्टेलमधल्या स्टाफवर अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे. मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ (Video) स्टाफमधल्या काही जणांनी बनवल्याचं इथल्या मुलींचा आरोप आहे. एका मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवताना स्टाफमधल्या एकाला पकडल्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं.

उत्तर प्रदेशमधल्या रावतपूर ठाणे क्षेत्रातल्या काकादेवमधल्य तुलसी नगर इथल्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरानंतर मुलींनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पकडण्यात आलेला आरोप हा गर्ल्स हॉस्टेलमध्ये शिपाई म्हणून काम करतो. एका मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवताना हॉस्टेलमधल्या दुसऱ्या मुलीने पाहिलं. तिने इतर मुलींना याची माहिती दिली. मुलींनी त्या शिपायाला रंगेहाथ पकडलं.

संतप्त झालेल्या मुलींनी या शिपायाकडून त्याचा फोन खेचून घेतला आणि तपासला. मोबाईलमधले व्हिडिओ पाहातच मुलींना धक्का बसला. त्याच्या मोबाईलमध्ये हॉस्टेलमधल्या अनेक मुलींचे अश्लील व्हिडिओ होते. यानंतर मुलींनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार दिली. विशेष म्हणजे या गर्ल्स हॉस्टेलचा मालक एक पोलीस अधिकारी आहे. या हॉस्टेलमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यातील मुली असून त्या मेडिकल परीक्षेची तयारी करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरु असून त्याचा मोबाईल फोनही तापसला जात आहे.