VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या मुलीची किरकोळ गोष्टीवरून डॉक्टरला मारहाण, वडिलांना मागावी लागली माफी

मुलीच्या या कृत्यामुळे मुख्यमंत्र्यांना जाहीर माफी मागावी लागली आहे

Updated: Aug 21, 2022, 08:55 PM IST
VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या मुलीची किरकोळ गोष्टीवरून डॉक्टरला मारहाण, वडिलांना मागावी लागली माफी title=

दिल्ली :  मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा (Zoramthanga) यांच्या मुलीने डॉक्टरला मारहाण (Mizoram CM Daughter Slapped Doctor) केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर खुद्द मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी जाहीर माफी मागितली आहे. 

राजधानी ऐझॉलमधील एका क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांची मुलगी मिलारी छांगटे हिला परवानगीशिवाय भेटण्यास नकार दिल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला क्लिनिकमध्ये सल्लामसलत करण्यासाठी येण्यापूर्वी परवानगी घेण्यास सांगितले होते. बुधवारी हा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.

 मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर म्हटले आहे की, "मुलीच्या या वागणुकीचे कोणत्याही प्रकारे समर्थन करू शकत नाही. मुलीने डॉक्टरकडे जाऊन त्यांची माफी मागितली आहे." 

या घटनेमुळे डॉक्टर संतापले आहेत. शनिवारी, 800 हून अधिक डॉक्टरांनी कथित हल्ल्याचा निषेध करत आंदोलन केले. आंदोलकांपैकी एका डॉक्टरने सांगितले की, छांगटे यांनी ऐझॉलमधील त्वचारोगतज्ज्ञांवर हल्ला केला होता. डॉक्टरांनी छांगटे यांना दवाखान्यात अपॉइंटमेंट घेऊन यायला हवे होते, असे सांगितल्याने ती संतापली आणि तिने हल्ला केला. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मुलानेही सोशल मीडियावर बहिणीच्या वतीने माफी मागितली होती आणि मानसिक तणावामुळे बहिणीची हे कृत्य केल्याचे सांगितले.