सर्वात महागड्या आंब्याच्या सुरक्षेसाठी, सगळ्यात हाय सिक्युरिटी

का आहे एवढा महागडा हा आंबा 

Updated: Jun 18, 2021, 01:09 PM IST
सर्वात महागड्या आंब्याच्या सुरक्षेसाठी, सगळ्यात हाय सिक्युरिटी  title=

मुंबई : मध्यप्रदेशच्या जबलपुरमध्ये एका आमराईच्या सुरक्षेसाठी तब्बल 9 श्वान आणि 3 गार्ड तैनात करण्यात आले आहे. आमराईत लावलेल्या या आंब्याची किंमत लाखो रुपये आहेत. जापानमधील जातीचं हा खास आंबा सध्या खूप चर्चेत आहे. (Miyazaki Mangoes: Madhya Pradesh family deploys security, dogs to guard Rs 2.75 lakh mango) जबलपुरमधील या आंब्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ही तब्बल 2 लाख 70 हजार रुपये इतकी आहे. 

जबलपुरच्या हवेत तयार झालेला हा आंबा हजारोत नाही तर लाखो रुपयांत विकला जातो. म्हणून या आंब्याच्या सुरक्षेसाठी मोठी सिक्युरिटी बसवण्यात आली आहे. या आंब्यांची काळजी घेण्यासाठी 3 गार्ड आणि त्यांच्या मदतीला 9 श्वान या आमराईत 24 तास तैनात असतात. 

आमराईचे मालक संकल्पने सांगितलं की, जापानी आंब्याचं नाव 'टाइयो नो टमेंगो' आहे. या आंब्याला सुर्याचं अंड म्हणून ओळखलं जातं. गेल्या काही दिवसांपासून हा आंबा चर्चेत आहे. ज्याच्यामुळे हा आंबा चोरी झाली. एवढ्या महागड्या आंब्याची चोरी होणं हे खूप नुकसानीचं आहे. म्हणून त्यांनी सुरक्षा रक्षक ठेवले आहेत. 

हा आंबा पूर्ण पिकल्यावर लाल आणि पिवळ्या रंगाचा होता. याचं वजन जवळपास 900 ग्रॅम असून हा आंबा खायला खूप गोड असतो. आंब्याची ही प्रत जापानच्या वातावरणात उगवली जाते. मात्र संकल्प सिंह परिहार यांनी ओसाड जमिनीवर ही आमराई फुलवली आहे. 

जापानमध्ये 2017 मध्ये जवळपास 36 सौ डॉलरमध्ये या आंब्याची बोली लावण्यात आली. भारतात जवळपास या आंब्याची किंमत अडीच लाख आहे. सुरूवातीला आंब्याला चार एकर जमिनीत लावण्यात आलं होतं. आता भारतातील 14 हायब्रिड आणि सहा विदेशी आंब्याच्या जाती देखील लावल्या आहेत. भारतात या आंब्याची शेती अजून कुठे होत नाही. जापानमध्ये तामागो नावाने हा आंबा ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात याची खूप मागणी आहे.