इनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करण्याची वाढीव मुदतही संपली? लेट कमर्स इकडे लक्ष द्या...

...जर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न फाईल केली नसेल तर, त्वरीत करा अन्यथा आपल्या अडचणी सुरू झाल्या आहेत हे गृहित धरून चाला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 7, 2017, 04:32 PM IST
इनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करण्याची वाढीव मुदतही संपली? लेट कमर्स इकडे लक्ष द्या... title=
income tax news in Marathi

नवी दिल्ली : इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारिख 31 जुलै होती. अनेकांच्या अडचणी विचारात घेऊन सरकारने ही मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली. पण, तरीही काही मंडळींनी इनकम टॅक्स रिटर्न फाईल केलीच नाही. तुम्हीही अशा मंडळींमध्ये येत असाल तर, वेळीच सावध व्हा. तुम्ही आयकर खात्याच्या नजरेत येऊ शकता. वेळेत इनकम टॅक्स रिटर्न भरण्यात आपला फायदाच आहे. उशीर केला तर नुकसान आहे. जर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न फाईल केली नसेल तर, त्वरीत करा अन्यथा आपल्या अडचणी सुरू झाल्या आहेत हे गृहित धरून चाला.

जर तुमच्या वार्षीक उत्पन्नावर इनकम टॅक्स शिल्लख आहे. (जो कर तुम्ही भरला नाही) त्यातही 1 एप्रिल 2017 पासून तुमचा कर भरणा शिल्लख आहे. तर त्यावर कराची शिल्लक रक्कम पर्यंत व्याज द्यावे लागेल. शिल्लक रकमेवर टॅक्स रेट हा प्रतिमहिना 1 टक्का इतका आहे.

सरकारने ठरवून दिलेल्या मुदती नंतर तुम्ही जर इनकम टॅक्स रिटर्न फाईल  करत असाल तर, तुम्हाला उशीर होण्याचे कारण विचारले जाईल. हे कारण योग्य की अयोग्य हे ठरवणे आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांच्या विवेकावर (मनावर) अवलंबून असेन. जर संबंधीत अधिकाऱ्याला तुमचे कारण पटले नाही तर, तुम्हाला 5 हजारांचा दंडही केला जाऊ शकतो. हा दंड तुमच्या टॅक्स रकमेच्या अतिरीक्त असेन.

1 एप्रिल 2017 पासून ज्या तारखेला आपण इनकम टॅक्स रिटर्न फाईल करत अहात त्या तारखेपर्यंत आपल्याला कर रकमेवर 1 टक्के व्याज द्यावे लागेल. पण, ही व्याज आकारणी तुम्ही जर इनकम टॅक्स फाईल करण्यास ठरवून दिलेल्या मुदतीपेक्षा अधिक उशीर केला असले तरच केली जाईल.

दरम्यान, जर तुमचा कोणताही कर भरणा शिल्लख नसेल तर, तुम्हाला व्याज भरण्याची गरज नाही. पण, दंडापोटी आकारण्यात आलेली रक्कम मात्र तुम्हाला नक्कीच भरावी लागेल. पण, दंड आकारायचा की नाही तसेच, आकारल्यास तो किती आकारायचा हे सुद्धा महसुल अधिकाऱ्याच्या विवेकावर (मनावर) अवलंबून असेन. हा नियम 31 मार्च 2018 पर्यंतच लागू असेन. पूढच्या आर्थिक वर्षात तुम्हाला पुन्ही नव्याने इनकम टॅक्स रिटर्न फाईल करावी लागेल.

दरम्यान, इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणे ही देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तुम्ही जर वेळेतच इनकम टॅक्स रिटर्न फाईल केली असेल तर, तुम्हाला चिंता करण्याचे काहीच कारण नाही.