मुंबई : कोविड 19 मधून बरे झालेल्या मुलांमध्ये आता नव्या आजारामुळे चिंता वाढली आहे. 'मल्टी-सिस्टम इनफ्लॅमेटरी सिंड्रोम' (MIS-C) कोविडमधून बरे झाल्यानंतर मुलांमध्ये एक नवीन आजाराचं निदान होत आहे. हे सिंड्रोम बर्याच अवयवांना प्रभावित करते आणि सहसा कोविड संक्रमित झाल्यानंतर कित्येक आठवड्यांनंतर दिसून येते.
कोरोनावर मात केल्यानंतर मुलांना 'मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम' होण्याचा धोका वाढला आहे. फोर्टिस हेल्थकेअरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. योगेश कुमार गुप्ता म्हणाले, 'हे धोकादायक आहे की जीवघेणं हे मी सांगू शकत नाही, परंतु काहीवेळा या संसर्गाचा मुलांवर वाईट परिणाम होतो. हे मुलांच्या हृदय, यकृत आणि मूत्रपिंडांवर वाईट परिणाम करू शकते.
कोरोनाच्या किती दिवसानंतर उद्भवते?
बालरोग तज्ञ डॉ. योगेश यांनी सांगितले की, हे संसर्ग झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनंतर उद्भवते. डॉ. गुप्ता म्हणाले की, एमआयएस-सी हा कोरोनाशी लढण्यासाठी शरीरात तयार झालेल्या प्रतिजैविकांच्या प्रतिक्रियेचा परिणाम आहे. ते म्हणाले, 'कोरोनाचा संसर्ग अशी एक गोष्ट आहे ज्याची आपल्याला चिंता नसते कारण बहुतेक प्रकरणांमध्ये त्याची सौम्य लक्षण असतात पण एकदा या संसर्गापासून मुक्त झाल्यावर मुलांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. याच अँटीबॉटी मुलांच्या शरीरात प्रतिक्रिया करतात. ज्यामुळे शरीरात एलर्जी सारख्या गोष्टी तयार होतात.
डॉ. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार एमआयएस-सी कोविड दरम्यान नव्हे तर कोरोना संसर्गापासून मुक्त झाल्यानंतर हृदय, यकृत आणि मूत्रपिंडासारख्या अवयवांवर परिणाम करते. गेल्या वर्षी अशी तीन प्रकरणे आली होती तर दुसर्या लाटेत दोन प्रकरणे समोर आली होती. कोरोना विषाणूची साथ शिगेला पोहोचल्यानंतर एमआयएस-सीची आणखी प्रकरणे येऊ शकतात अशी भीती आहे.