मुंबई : जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकीसाठी पर्यायाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे. मिरे एसेट मॅनेजर प्रायवेट लिमिटेडने 'मनी मार्केट फंड' लॉंच केला आहे.
NFO जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पर्यायाचा शोध घेत आहात. तर तुमच्याकडे चांगला पर्याय आहे. मिरे एसेट इनवेस्टमेट मॅनेजर्स प्रायवेट लिमिटेडने मिरे एसेट मनी मार्केट फंड लॉंच किया है. नवीन फंड ऑफर 4 ऑगस्टपर्यंत 2021 सब्सक्रिप्शनसाठी खुला असणार आहे. ही एक ओपन एंडेड स्किम आहे. जी मनी मार्केट इंस्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक करते. ही स्किम 12 ऑगस्टपर्यंत खुली असणार आहे.या फंडला निफ्टी मिनी मार्केट इंडेक्सद्वार बेंचमार्क केले जाणार आहे.
कमीत कमी 5000 रुपये गुंतवणूक
या स्किममध्ये कमीत कमी 5000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर 1 रुपयांच्या पटीत रक्कम गुंतवता येईल. या फंडमध्ये रेग्युलर प्लॅन किंवा डायरेक्ट प्लॅनचा ऑप्शन देखील उपलब्ध आहे. ज्यामध्ये ग्रोथ, इनकम, डिस्ट्रीब्युशन आणि कॅपिटल विड्रावल (IDCW) पर्याय उपलब्ध आहे.
हा फंड त्या गुंतवणूकदारांसाठी चांगला आहे. ज्या गुंतवणूकदारांचे लक्ष 1 वर्षापर्यंत असते. या फंडचे लक्ष चांगली रिस्क एडजस्टेड रिटर्न देणे असते. फंड अंतर्गत मुख्यतः गुंतवणूक मनी मार्केटमध्ये केली जाते. ज्यांची मॅच्युरिटी एका वर्षासाठी असते.