बाजारात आला Bhubali Samosa;अर्ध्या तासात संपवा आणि जिंका मोठी रक्कम

तुम्हाला फक्त खायचाय एकच समोसा आणि जिंका मोठी रक्कम

Updated: Oct 29, 2022, 01:52 PM IST
बाजारात आला Bhubali Samosa;अर्ध्या तासात संपवा आणि जिंका मोठी रक्कम title=

जर तुम्ही समोसा (samosa) प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला कोणी विचारले की तुम्ही एका वेळी किती समोसे खाऊ शकता? तर शक्यतो तुम्ही फक्त 3 किंवा जास्तीत जास्त चार समोसे खाऊ असे उत्तर द्याल. पण, जर तुम्हाला एकच समोसा खायचा आहे, तोही 30 मिनिटांत आणि यासाठी तुम्हाला मिळणारयत 51 हजार रुपये. तर तुम्ही काय कराल? पण, त्याआधी ही बातमी एकदा पूर्ण वाचा. कारण तुम्हाला आठ किलोचा बाहुबली समोसा खायचा आहे. (Meerut eat Indias Largest 8 kg Samosa and Win 51000)

सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमध्ये (Meerut) मिठाईचे दुकान आहे. शुभम नावाची व्यक्त हे दुकान (Kaushal Sweets) चालवते. या दुकानाची खासियत म्हणजे इथे बाहुबली समोसा (Bahubali Samosa) मिळतो, तोही आठ किलोचा. त्यात भरपूर बटाटे (potato) आणि चीज (cheese) असल्याचे त्याचीविचारू नका. या समोशाची किंमत 1100 रुपये असून तो खाल्ल्यास 51,000 रुपयांचे रोख बक्षीसही मिळेल. फूड ब्लॉगर चाहत आनंदने हा समोसा सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर समोशाच्या या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या क्लिपमध्ये चाहत आनंद हा महाकाय समोसा पकडून त्याचा एक तुकडा कापताना दिसत आहे.

प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी देखील हा व्हिडिओ कॅप्शनसह शेअर केला आहे. या दिवाळीत माझ्या पत्नीने सर्व मिठाईनंतर माझ्या जेवणासाठी फक्त एक समोसा ऑर्डर केला आहे, असे हर्ष गोयंका यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ आतापर्यंत पाच लाखांहून अधिक जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. समोशांचा आकार पाहून लोक थक्क झाले आहेत. हा एक समोसा खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या वाढू शकतात, असे अनेकांनी म्हटलं आहे. काहींनी हा समोसा खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या समोसा व्यतिरिक्त, या दुकानदाराने यापूर्वी चार किलोग्रॅमचे प्रकारही आणले होते. त्यामध्ये घेवर आणि गुलाब जामुन यांसारख्या स्वादिष्ट मिठाईच्या श्रेणीसाठी देखील प्रसिद्ध आहेत.