'सॅलरी' या शब्दाचा जन्म कसा झाला माहितीये? त्याचा मीठाशी काय संबंध?

Meaning of Salary : सॅलरीचा इतिहास फारच रंजक... माहिती जाणून या सॅलरीचा आता करता त्याहूनही जास्त आदर करायला लागाल... पैशापैशाची किंमत कळेल...   

सायली पाटील | Updated: Aug 30, 2024, 02:09 PM IST
'सॅलरी' या शब्दाचा जन्म कसा झाला माहितीये? त्याचा मीठाशी काय संबंध?  title=
Meaning of a word salary related with salt

Meaning of Salary : महिनाअखेर आला की खिशा इतका हलका होतो की त्यात हात टाकण्याचं धाडसही काही मंडळी करत नाहीत. महिन्याच्या सुरुवातीचा आठवडा राजेशाही थाटाचा आणि त्यानंतर शेवटचा आठवडा... ही सर्व गणितं, या साऱ्या हिशोबाचा सूत्रधार असतो तो म्हणजे खात्यात जमा होणारा पगार किंवा सॅलरी. 

नोकरदार असो किंवा मग आणखी कोणी, कामाला मोबदला ज्या ज्या व्यक्तीला मिळतो त्या व्यक्तीसाठी ही सॅलरी अतिशय महत्त्वाची असते. 'सॅलरी हॅज बिन क्रेडिटेड...' असा मेसेज जेव्हा मोबाईलवर येतो तेव्हा अनेकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. अशा या आर्थिक गरजा भागवण्यासाठी आधार देणाऱ्या आणि प्रत्यक्षात आर्थिक गरजा भागवणाऱ्या सॅलरी शब्दाचा जन्म कुठे झाला माहितीये? 

मीठावरून मिळाला हा शब्द? 

सॅलरी या शब्दाच्या जन्माच्या कहाणीसाठी खूप वर्षे मागे जावं लागेल. कारण हा तो काळ होता ज्यावेळी मीठाला अनन्यसाधारण महत्त्वं आणि किंमत प्राप्त होती. इतिहासकार आणि अभ्यासक डॉ. श्रीनंद बापट यांनी एका पॉडकास्टमध्ये यासंदर्भातील माहिती देत काही कमाल उल्लेख केले. गतकाळात गांधीजींनी केलेला मीठाचा सत्याग्रह यशस्वी झाला कारण त्या काळा किंबहुना त्याहीपेक्षा जुन्हा काळात मीठ अतिशय महाग दरात विकलं जात होतं. 

हेसुद्धा वाचा : भजीला इंग्रजीत काय म्हणतात? अतिसामान्य प्रश्न, पण उत्तर माहितीये का? 

1950 सालपर्यंत मीठ दुर्मिळ होतं. समुद्रकिनारी मीठ झालं तर... किंवा आजुबाजूला खनिजरुपात आढळलं तरच. अन्यथा मीठाची आयात होणार तेव्हा ते मिळणार याच कारणास्तव मीठाचा सत्याग्रह यशस्वी झाला. कारण, ते आधीच महाग असताना त्यावर कर आकारला जात होता. मीठ मिळवणं ही सोपी गोष्ट नव्हती... सॅलरी हा शब्द प्रत्यक्षात मीठ आणि त्याचा इंग्रजी अर्थ Salt वरून आला आहे. कारण, पीठ, धान्य आणि इतर गोष्टींचा व्यवहार देवाणघेवाण स्वरुपात होऊ शकतो. पण, मीठ ही गोष्ट अशी आहे जी प्रत्यक्षात पिकवता येणार नसून ती विकतच घ्यावी लागते. त्यासाठी अर्था मीठासाठी दिलेले पैसे म्हणजे 'सॅलरी'. संपूर्ण जगभरात हेच सूत्र लागू आहे. थोडक्यात जगभरात पगाराचा हाच फॉर्म्युला आहे. सॅलरी हा शब्द मीठावरून आला. म्हणूनच 'खाल्लेल्या मीठाला जागणं' असं भारतात अनेक संदर्भांमध्ये म्हटलं जातं. 

रोमपर्यंत इतिहासाची पाळंमुळं 

काही इतर संदर्भांनुसार इतिहासकार प्लीनी द एल्डर त्यांच्या 'नॅचरल हिस्ट्री' या पुस्तकात लिहितात की, रोममध्ये सैनिकांना कामाच्या मोबदल्यात मीठ दिलं जात असे. हाच मोबदला 'सॅलरी' नावानं ओळखला गेला. असं म्हटलं जातं की Salt वरूनच Salary शब्दाची सुरुवात झाली. काही संदर्भांनुसार Soldier शब्दाला लॅटिन भाषेमध्ये ‘sal dare’ असं म्हटलं जातं. या शब्दाचा अर्थही मीठाच्या देवाणघेवाणीशी संबंधित आह. रोमन भाषेत मीठाला सेलेरियम असं म्हणतात, तेव्हा आता तुमच्या लक्षात आलंच असेल की सॅलरी हा शब्द आला तरी कुठून...