मुंबई : देशात होणारे दहशतवादी हल्ले लक्षात घेत आणि वाढत्या दहशतवादाचा अंत करण्यासाठी एनआईए (NIA) ची स्थापना करण्यात आली. 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर धक्कादायक घटनांचा तपास करून त्यांना वेळीच आळा घालणाऱ्या तपास यंत्रणेची नितांत गरज होती. अशा यंत्रणा ज्या केंद्र सरकारच्या अखत्यारितील दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवून त्यांचा अंत करतील.
NIA चं पूर्ण नाव National Investigation Agency आहे, ज्याला राष्ट्रीय तपास यंत्रणाही म्हणतात. 31 डिसेंबर 2008 रोजी भारतीय संसदेने पारित केलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणा विधेयक 2008 अंतर्गत NIA ची स्थापना करण्यात आली. (NIA Founded 31 December 2008)
राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पहिले महासंचालक राधा विनोद राजू (Radha Vinod Raju) होते ज्यांचा कार्यकाळ 31 जानेवारी 2010 रोजी संपला. देशातील दहशतवादी कारवाया (terrorist activities) थांबवणे आणि भारतातील दहशतवाद संपवणे हे एनआयएचे काम आहे. या यंत्रणेला भारत सरकारकडून अनेक विशेष अधिकार मिळाले आहेत.
कशी मिळते NIA मध्ये नोकरी?
एनआयएमध्ये भरती प्रक्रिया दरवर्षी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे केली जाते. राष्ट्रीय तपास यंत्रणेत भरती कधी निघते याकडे फक्त लक्ष ठेवावं लागतं. त्यासाठी तुम्ही https://www.nia.gov.in/recruitment-notice.htm या पोर्टलवर जाणून तुम्ही माहिती मिळवू शकता.
वाचा ही बातमी : PFI म्हणजे काय, त्यांचं काम तरी काय? जाणून घ्या का ताब्यात घेतली जात आहेत या संघटनेची माणसं
पात्रतेनुसार तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता. कारण राष्ट्रीय तपास यंत्रणेमध्ये सर्व पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेची अट आहे.
NIA मध्ये विविध पदांसाठी सुविधा आणि वेतन (recruitmentin nia)
Technical Forensic Psychologist: 15600-39100 + ग्रेड पे 5400/- रुपये
Crime Scene Assistant: 15600-39100 + ग्रेड पे 5400/- रुपये
Cyber Forensic Examiner: 15600-39100 + ग्रेड पे 5400/- रुपये
Explosive Expert: 15600-39100 + ग्रेड पे 5400/- रुपये
Biology Expert: 15600-39100 + ग्रेड पे 5400/- रुपये
Superintendent of Police: 15600-39100 + ग्रेड पे 7600/- रुपये
Additional Superintendent of Police: 15600-39100 + ग्रेड पे 6600/-
Deputy Superintendent of Police: 15600-39100 + ग्रेड पे 5400/- रुपये
Inspector: 9300-34800 + ग्रेड पे 4600/- रुपये
Sub Inspector: 9300-34800 + ग्रेड पे 4600/- रुपये
Accountant: 9300-34800 + ग्रेड पे 4200/- रुपये
Stenographer: 9300-34800 + ग्रेड पे 4200/- रुपये
Assistant: 9300-34800 + ग्रेड पे 4200/- रुपये
Photographer: 9300-34800 + ग्रेड पे 4200/- रुपये