MBBS Doctor Viral Post Twitter: इंजिनिअरींग आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी (Doctor Salary) हे लहानपणापासून पाहत असतात. अनेकांनाही कायमच वाटत राहत की, एकदा इंजिनियर आणि डॉक्टर झाल्यानंतर तुमचं लाईफ सेट होऊन जाते तुम्हाला फार (MBBS Doctor emotional Post) काहीच करायची गरज लागत नाही असे अनेकांचे मतं असते. परंतु सध्या समोर आलेली बातमी ही त्याहून वेगळी आहे. तुम्ही जर का असा विचार करत असाल की डॉक्टर आणि इंजिनिअर झाल्यानंतर अनेकांनी लाईफ ही सेट होऊन जाते तर कदाचित हे ट्विट पाहिल्यानंतर तुमचं मतं कदाचित बदलेल. हो, अशाच एका एमबीबीएस डॉक्टर खुद्द ट्विट करून याबद्दलची माहिती (Twitter Viral Post) दिली आहे.
पालकही कायम हाच विचार करत असतात की, आपल्या मुलानं इतर कुठल्या वेगळ्या क्षेत्रात जाण्यापेक्षा याच फिल्डमध्ये आपलं करिअर करावं. जेणेकरूण भविष्याची काहीच चिंता नाही यासाठी पालक हे मुलांकडून भरमसाठ मेहमत करून घेतात. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या अभ्यासासाठी अपार कष्ट घेतात. आपला अमूल्य वेळही त्यांच्या अभ्यासासाठी देतात. त्यातून अनेक (Salary after MBBS) गोष्टींचा त्यागही करतात. अशावेळी त्यांच्या मनात एक विचार असतो की, आपली मुलं ही लवकरात लवकर इंजिनिअर अथवा डॉक्टर व्हावीत. मुलंही त्यासाठी अपार मेहनत घेताना दिसतात. परंतु ही पोस्ट कदाचित तुम्हाला वेगळ्याच विचारात नेऊ शकते.
सध्या ट्विटरवर असंच एक ट्विट व्हायरल होतं आहे ज्यात एका डॉक्टरनं आपले शिक्षण पुर्ण झाल्यानं मिळालेल्या पगाराबद्दल लिहिले आहे. हे डॉक्टर हैद्राबादचे आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 20 वर्षांपुर्वी मी एक तरूण डॉक्टर होतो. 4 वर्षे डीएम न्यूरोलॉजी केल्यानंतर (2004) माझा पगार हा 9000 रूपये महिना होता. एमबीबीएस करून 16 वर्षे लोटली. माझ्या प्राध्यापकांना, सीएमसी वेल्लोरेमध्ये पाहून मला जाणवले की, डॉक्टरांचे आयुष्य हे काटकसरी पाहिजे आणि कमी गोष्टींमध्येच जगता आलं पाहिजे.
त्या आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला सरकारी कार्यालयातील एका प्यूनच्या बरोबरीचा पगार मिळतो आहे हे ऐकून माझ्या आईला फार वाईट वाटायचे. माझ्या आईनं MBBS, MD आणि DM 12 वर्षे माझ्यासाठी खर्च घातली. आईचं प्रेम आणि वेदना तुम्ही समजूनच शकता.
I was happy with that salary, however, my mother felt upset seeing me get the same salary what a peon got in govt office (where my father worked). She had seen me study hard for 12 years in schooling, followed by 12 years of MBBS, MD & DM. You can understand a mother's love &… https://t.co/XC0V3tgVEi
— Dr Sudhir Kumar MD DM (@hyderabaddoctor) April 4, 2023
त्यांनी अशीही आठवण शेअर केली आहे की ते डॉक्टरकीचे शिक्षण घेत होते तेव्हा त्यांच्याकडे दोन जोडी कपडे होते. कधी महागड्या हॉटेलमध्ये गेले नाहीत. कधी व्यसन केले नाही व कधी चित्रपटही पाहायला गेले नाही. त्यांनी अभ्यासासाठी सिनियर्सकडून पुस्तके घेतली होती.