Chaiwala Buy 90 Lakh Car: कधी काळी विकायचा चहा; आता विकत घेतली 90 लाखांची Mercedes

MBA Chaiwala Buy Mercedes Luxury Car: त्याने इन्स्टाग्रामवर गाडी खरेदी करतानाचा फोटो शेअर केला असून त्याने या फोटोला दिलेली कॅप्शनही चर्चेत आहे.

Updated: Feb 15, 2023, 07:42 PM IST
Chaiwala Buy 90 Lakh Car: कधी काळी विकायचा चहा; आता विकत घेतली 90 लाखांची Mercedes title=
Chaiwala Buy 90 Lakh Car

Chaiwala Buy Mercedes Car: एमबीएचं शिक्षण देणाऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी दिली जाणारी कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट म्हणजेच CAT Exam पास न होऊ शकलेल्या प्रफुल बिल्लौरी (Prafull Billore) म्हणजेच 'एमबीए चायवाला' (MBA Chaiwala) आज कोट्याधीश आहे. त्याला आज संपूर्ण भारतात ओळख मिळाली आहे. या 30 वर्षीय तरुणाने फार कमी वयात यश मिळवलं आहे. प्रफुलने नुकतीच मर्सिडीजची एक आलिशान एसयूव्ही (Mercedes GLE 300D) विकत घेतली आहे. प्रफुलने जवळजवळ 90 लाख रुपये किंमतीची GLE 300D ही कार खरेदी केली आहे. ही गाडी लक्झरी कार बनवणाऱ्या मर्सिडीजच्या हायएण्ड म्हणजेच महागड्या कार्सपैकी एक आहे.

कॅप्शन चर्चेत...

प्रफुलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाडी खरेदी केल्यानंतरचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याने या फोटोला दिलेली कॅप्शनही चर्चेत आहे. "जिंदगी धीरे-धीरे बदलती जा रही है," असं प्रफुलने हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे. या फोटोमध्ये प्रफुलबरोबर त्याची पत्नी पत्नी आणि मुलगाही दिसत आहे. कारचा अन्य एक फोटो पोस्ट करताना, "देवाचा आशीर्वाद, कुटुंबाची साथ, सर्वांची मेहन आणि जगभरातील लोकांना दाखवलेलं प्रेम व प्रार्थनेमुळे आज Mercedes GLE 300D नवीन पाहुणी म्हणून घरी आली. आयुष्यभर लक्षात राहतील आठवणी तयार करण्यासाठी आम्ही तयार आहोत," असं म्हटलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prafull Billore (@prafullmbachaiwala)

प्रफुलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाडी डिलिव्हर करण्यात आली त्यावेळेचा व्हिडीओही शेअर केला आहे.

Mercedes GLE 300D मध्ये काय आहे खास?

या कारमध्ये अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 2.0 लीटरचं सिलेंडर टर्बोचार्ज डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 245 Ps (हॉर्सपॉवर) ताकद आणि 500 Nm (न्यूटन मीटर) टॉर्क जनरेट करतं. कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशनबरोबर येते. ही कार केवळ 7.2 सेकंदांमध्ये 0 ते 100 चा वेग पकडते. या गाडीची टॉप स्पीड 225 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. 

कोण आहे प्रफुल बिल्लौरी

प्रफुल बिल्लौरी 'एमबीए चहावाला'चा संस्थापक आहे. एमबीएला प्रवेश मिळाला नाही म्हणून त्याने चहाची टपरी सुरु केली. त्यानंतर त्याने कॉर्परेट लूक देत 'एमबीए चहावाला'ची स्थापना केली. तो मूळचा गुजरातचा असून त्याचा जन्म 1996 साली झाला आहे. त्याची नेटवर्थ 30 लाख डॉलर म्हणजेच 24 कोटी रुपयांहून थोडी अधिक आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एमबीएच चायवालाचे भारतामध्ये एकूण 100 आउटलेट्स आहेत. प्रफुलने 2017 मध्ये आपला बिझनेस सुरु केला होता. व्यवसायामध्ये यशस्वी झाल्यानंतर आता प्रफुल बिल्लोरी मोटिव्हेशनल स्पीकर म्हणूनही काम करतो.