मायावतींची मोठी घोषणा, पक्षाच्या बैठकीत उत्तराधिकारीची निवड; कोण आहे आकाश आनंद?

Mayawati Declared Succesor: मायावती यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी मोठी घोषणा केली आहे. आज झालेल्या बैठकीत त्यांनी उत्तराधिकारी घोषित केला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 10, 2023, 01:52 PM IST
मायावतींची मोठी घोषणा, पक्षाच्या बैठकीत उत्तराधिकारीची निवड; कोण आहे आकाश आनंद? title=
Mayawati big decision ahed loksabha election in BSP meeting declared nephew Akash Anand as her successor

Mayawati Declared Succesor: उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आपला उत्तराधिकारी घोषित केला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावती यांनी मोठी घोषणा केली आहे. मायावती पक्षाची जबाबदारी त्यांचा भाचा आकाश आनंद यांच्यावर सोपवणार आहे. पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यानही आकाश आनंद यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला होता. आकाश आनंद यांनी मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगढपर्यंत पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता 2024च्या लोकसभा निवडणुकां डोळ्यांसमोर ठेवून मायावती आकाश आनंद यांना त्यांचा उत्तराधिकारी घोषित केला आहे. 

बसपा प्रदेश पदाधिकारी आणि जिल्ह्याचे नेत्यांची रविवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मायावती यांनी ही घोषणा केली आहे. मायावती यांच्या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मायवती या 2024ची लोकसभा अगुआई या मतदारसंघातून लढवणार असल्याचं बोललं जात आहे. या आधीही मायावती यांनी बसपा देशाच्या सार्वत्रिक निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे  जाहीर केले होते. मात्र, आता आकाश आनंद यांची उत्तराधिकारी म्हणून निवड होताच बसपाकडून युतीसंदर्भातही काही निर्णय होण्याची शक्यता आहे. 

रविवारी पार्टीच्या प्रदेश अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मायावती यांनी आकाश आनंद यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. दरम्यान, मायावती गेल्या काही दिवसांपासून राजकारणात पूर्वीप्रमाणे सक्रिय नसल्याच्या चर्चा रंगत होत्या. जाहिर सभांमध्येही मायावती सक्रीय सहभागी होत नसल्याचे बोललं जात होतं. अशावेळी आकाश आनंदसारख्या तरुण चेहऱ्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवून पुन्हा एकदा बसपा बहुजन समाजाचा विश्वास प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच, लोकसभा निवडणुकांपूर्वी बसपा आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. 

कोण आहे आकाश आनंद?

आकाश आनंद मायावती यांच्या लहान भावाचा मुलगा आहे. आकाश यांनी लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (MBA)चे शिक्षण पूर्ण केले आहे. 2017 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. 2017 मध्ये मायावती यांनी सहारनपूरच्या सभेत पहिल्यांदा आनंद यांना मंचावर आणले होते. आकाश आनंद यांची पॉलिटिलकल लाँचिग तेव्हाच झाली असे सांगितले जाते. तेव्हापासून त्यांना मायावती यांचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातं होतं. अखेर रविवारी त्यांच्याच नावाची घोषणा करण्यात आली.