मारुतीची ग्राहकांसाठी खुशखबर, एक महिन्यापर्यंत 'ही' सर्विस मोफत

 मारुती सुझुकी इंडीयाने आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणली आहे.

Updated: Jun 21, 2019, 06:30 PM IST
मारुतीची ग्राहकांसाठी खुशखबर, एक महिन्यापर्यंत 'ही' सर्विस मोफत  title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडीयाने आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणली आहे. मारुतीने मान्सून सर्विस कॅंप सुरु केले आहे. यामध्ये मारुतीच्या ग्राहकांसाठी मोफत सर्विस मिळणार आहे. मारुतीच्या ऑथोराइज्ड सर्विस सेंटरमध्ये तुम्हाला या संधीचा लाभ घेता येणार आहे. मारुतीची ही ऑफर 20 जून ते 20 जुलैपर्यंत सुरु असणार आहे. एक महिना चालणाऱ्या या ऑफरमध्ये हेल्थ चेकअप कॉम्प्लीमेंट्री देण्यात येणार आहे.

कुठे मिळेल सुविधा ? 

मारुती सुझुकीच्या देशभरातील सर्विस स्टेशनमध्ये ही सुविधा मिळेल. नेक्सा आणि ऐरेनेसाठी देखील ही सुविधा आहे. मान्सूनच्या सिझनमध्ये कारच्या डागडुजीसाठी ही ऑफर काढण्यात आली आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील ही सुविधा उपलब्ध आहे. मान्सूनमध्ये कारमध्ये कोणत्या प्रकारची गडबड होऊ नये यासाठी ही ऑफर असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे. मारुतीने गेल्यावर्षी मान्सूनमध्ये फ्री सर्विस दिली होती.

कोणती सर्विस फ्री ? 

मारुतीने या ऑफरमध्ये ग्राहकांना कारच्या सर्व पार्ट्स आणि एसेससरीजवर डिस्काऊंट दिले आहे. याशिवाय ब्रेक्स, विंड स्क्रीन, वायपरब्लेड, बॅटरी. टायर, इलेक्ट्रीक सिस्टिम संदर्भातील कंपोनेंट्सची सर्विस पूर्णपणे फ्री देण्यात येणार आहे. यासाठी ग्राहकांनाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार नाही. जर कोणता पार्ट किंवा कोणते डेमेज पार्ट बदलायचा असेल त्याचाच चार्ज ग्राहकांना द्यावा लागेल. त्यावरही कंपनीतर्फे डिस्काऊंट दिला जाणार आहे.

सर्व ग्राहकांना संधी 

तुम्ही जर मारूतीचे ग्राहक असाल तर तुम्हाला या सर्विस कॅंपचा फायदा घेता येईल. तुमची कार किती जुनी आहे किंवा कोणत्या शहरातील आहे याचा या ऑफरशी काही संबंध नाही. कोणत्याही शहरातील मारुती सर्विसिंग सेंटरमध्ये जाऊन तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. यासाठी तुमच्या जवळच्या मारुती सर्विसिंग सेंटरमधून कॅम्पबद्दल माहिती घ्यावी लागणार आहे.