सप्तपदीआधी नववधूला लागले पिझ्झाचे डोहाळे, पिझ्झासाठी काय केलं पाहा व्हिडीओ

या तरुणीनं आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी चक्क लग्नाच्या मंडपात सप्तपदी सोडून पिझ्झापार्टी केली. 

Updated: Jul 26, 2021, 02:50 PM IST
सप्तपदीआधी नववधूला लागले पिझ्झाचे डोहाळे, पिझ्झासाठी काय केलं पाहा व्हिडीओ title=

मुंबई: पिझ्झा कोणाला आवडत नाही. पिझ्झा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यात पिझ्झा लव्हर असेल तर काही विचारायची सोयच नाही की. अशाच एक पिझ्झा प्रेमी नवऱ्यामुलीचा लग्नातील मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नात डोक्यावर अक्षता पडण्याआधी अनेक तरुणींना आपली सासरी जाण्यापूर्वी काही इच्छा पूर्ण करायच्या असतात. त्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय लग्न होऊ नये असं वाटत असतं. अगदी तशीच एक इच्छा नववधूची होती. सप्तपदीआधी या तरुणीला मोठा पिझ्झा खायचा होता. मन भरून पिझ्झा खाऊन मग सप्तपदी करायची होती. 

 

या तरुणीनं आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी चक्क लग्नाच्या मंडपात सप्तपदी सोडून पिझ्झापार्टी केली. या नववधूनं सप्तपदी नंतर आधी भलामोठा पिझ्झा मागवून तो मन भरेपर्यंत खाण्याचा आनंद घेतला. या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नववधूसाठी लग्न महत्त्वाचं की पिझ्झा? हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. 

भलामोठा पिझ्झा पाहून या नववधूनच्या चेहऱ्यावर जे सौंदर्य झळकलं आहे त्याला सोड़ नाही. ती हा पिझ्झा खाण्याचा पुरेपूर आनंद ह्या व्हिडीओमध्ये घेताना दिसत आहे. 

आतापर्यंत हा व्हिडीओ 67 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 2 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. हा व्हिडीओ जिथे काढला आहे ते एक ब्युटी पार्लर असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर या पिझ्झाच्या आकाराची आणि या नववधूची चांगलीच चर्चा होत आहे.