PNB घोटाळा: सीबीआयच्या रडारवर अनेक बँकेचे अधिकारी

PNB घोटाळ्यात सीबीआय आणि ईडीचं छापेमारीचं सत्र सतत सुरु आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 24, 2018, 10:08 AM IST
PNB घोटाळा: सीबीआयच्या रडारवर अनेक बँकेचे अधिकारी title=

नवी दिल्ली : PNB घोटाळ्यात सीबीआय आणि ईडीचं छापेमारीचं सत्र सतत सुरु आहे. 

सीबीआयच्या रडारवर आता अनेक बँक अधिकारी आहेत. सीबीआयने बँकेच्या 4 आणखी अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. ज्यामध्ये 2 GM आणि 2 AGM यांचा समावेश आहे.

या प्रकरणात आतापर्यंत 6 PNB च्या अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. आणखी काही अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे. नीरव मोदीच्या कमला मिल्समधील कार्यालयांवर देखील छापेमारी सुरु आहे. ट्रकभर कागदपत्र आतापर्यंत जमा करण्यात आले आहेत.

सीबीआयचे माजी डीआयजी अरुप पटनायक यांनी म्हटलं की, नीरव मोदीला भारतात आणणं कठिण आहे. बँकांमधील असे अनेक प्रकरणं तपासली तर 50 असे प्रकरणं बाहेर येतील.