गुजरातमध्ये 'GST'च्या मुद्द्यावरून मनमोहन सिंग साधणार मोदींवर निशाणा

नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला घेरण्यास सुरूवात केली आहे. याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यासाठी आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंगसुद्धा मैदानात उतरणार असल्याची माहीती आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 6, 2017, 05:26 PM IST
गुजरातमध्ये 'GST'च्या मुद्द्यावरून मनमोहन सिंग साधणार मोदींवर निशाणा title=

अहमदाबाद : नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला घेरण्यास सुरूवात केली आहे. याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यासाठी आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंगसुद्धा मैदानात उतरणार असल्याची माहीती आहे.

हिमाचल प्रदेश आण गुजरातमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा जोरदार तापला आहे. याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा करण्यासाठी कॉंग्रेस जोरदार मोर्चेबांधनी करत आहे. त्यासाठी कॉंग्रेस माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा एक ते दोन दिवसांचा गुजरात दौरा आखत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे एक दिवसांचा गुजरात दौरा करतील. आपल्या दौऱ्यात ते काही सभांमध्ये उपस्थिती लावतील. तसेच, जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयातील दोषही ते दाखवून देतील. अहमदाबाद येथील कॉंग्रेस कार्यालयात ते पत्रकार परिषद घेतील. मनमोहन सिंग यांनी यापूर्वीही नोटबंदी आणि जीएसटीवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

मनमोहनसींह यांचा दौरा कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावतीने आयोजीत पूर्वनियोजीत ब्लॅक डेच्या एक दिवस आगोदर होईल. कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष ८ नोव्हेंबरला काळा दिवस साजरा करून नोटबंदीचा विरोध करतील. तसेच, नोटबंदीमुळे अनेक असंघटीत कामगार बेरोजगार झाले. तर, अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक व्यापाऱ्यांनाही यामुळे नुकसान सहन करावे लागले, अशी जनजागृतीही कॉंग्रेस या वेळी करणार आहे. 

जीएसटीमुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागल्याचे बोलले जात आहे. या प्रश्नावर राहुल गांधी हे बुधवारी सूरतमध्ये दौरा करत आहेत. तसेच, त्यांनी याच मुद्दयावर ३ नोव्हेंबरलाही गुजरातमध्ये रॅली काढली होती.