वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करत काच्या फोडल्या; आरोपीचा कबुलीजबाब ऐकून पोलिसही चक्रावले

Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेवर दगडफेक करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने दिलेला कबुलीजबाब ऐकून पोलिसही हादरले आहेत.

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 15, 2023, 01:05 PM IST
वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करत काच्या फोडल्या; आरोपीचा कबुलीजबाब ऐकून पोलिसही चक्रावले title=
man throws stones at vande bharat train for fun news in marathi

Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये (Vande Bharat Express) दगडफेक करत खिडक्यांच्या काचा फोडणाऱ्या व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) अटक केलेल्या व्यक्तीने आपल्या कबुलीजबाबात दिलेल्या माहितीने पोलिसही चक्रावले आहेत. मध्य प्रदेश जिल्ह्यातील मुरैना जिल्ह्यात एका तरुणाने भोपाळ-दिल्ली (Bhopal-Delhi) वंदे भारत एक्स्प्रेस भरधाव वेगात असताना ट्रेनवर दगडफेक केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Vande Bharat Express Update)

वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक

ग्वालियरचे रेल्वे सुरक्षा दलातील पोलीस निरीक्षक संजय कुमार आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बानमोर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रानी कमलापती स्टेशनहून हजरत निजामुद्दीनकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 20171 वंदे भारत एक्सप्रेसवर रायरू-बानमोर रेल्वे स्टेशन दरम्यान दगडफेक करण्यात आली होती.या घटनेमुळं वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवाशांमध्ये चांगलीच घबराट पसरली होती. 

या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर आरपीएफ पोलिसांनी एक सर्च ऑपरेशन चालवले होते. चौकशीदरम्यान पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री फिरोज खान नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. तसंच, त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

कबुलीजबाब ऐकून पोलिस हैराण

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याने आपला गुन्हाही कबूल केला आहे. चौकशीत आरोपीने दिलेला कबुलीजबाब ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. आरोपीने वंदे भारत ट्रेनवर केलेली दगडफेकी कारण त्याला यात आनंद मिळतो. तसंच, त्याचा हा छंद असल्याचे त्याने पोलिसांसमोर कबुल केले आहे. पोलिस आरोपीची अजूनही कसून चौकशी करत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपीवर कोणत्याही गुन्ह्यांची नोंद नाहीये. मात्र पुढील तपास सुरू आहे.