Brother Killed Sister: भावा-बहिणीचे (Brother- Sister) नाते हे प्रेमाचे नाते समजले जाते. आई-वडिलांपासून एखादे गुपित लपवायचे झाल्यास ते आधी आपल्या बहिणीला सांगितात. किंवा वडिलांचा मारापासून वाचवण्यासाठी बहिणीच ढाल बनून पुढे येते. मात्र एक अशी घटना घडली आहे की, बहिणीच्या प्रेम-प्रकरणाबाबत कळल्यावर संतापलेल्या भावाने सख्ख्या बहिणीसोबत केलेला प्रकार पाहून अंगाचा थरकाप उडेल. भावाने बहिणीवर कुऱ्हाडीने वार करत तिचा जीव घेतला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.मात्र, पोलिसांनी छापेमारी करत त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
आजमगढ जिल्ह्यातील रौनापार क्षेत्रात ही घटना घडली आहे. सिंधुचे गावातीलच एका मुलासोबत अफेअर होते. दोघंही गावातच चोरुन चोरुन भेटत होते. ही गोष्ट सिंधुचा भाऊ प्रमोद यादवला कळाली. त्याने सिंधुला प्रियकराला भेटण्यास रोखले. मात्र, तरीही ती त्याला भेटतच राहिली. यावरुन दोघांमध्ये खूप वाददेखील झाले होते.
रागात 12 वर्षांच्या मुलाने घर सोडले, दोन दिवसांनी जंगलात सापडला मृतदेह, गळ्यात दोरी; गूढ कायम
शनिवारी रात्री सिंधू आणि प्रमोदचे वडिल घराच्या बाहेर शतपावली करत होते. त्याचवेळी याच कारणावरुन दोघा भाऊ-बहिणींमध्ये वाद झाली. वाद इतका वाढला की प्रमोदने घरात ठेवलेल्या कुऱ्हाडीने बहिणीच्या डोक्यावर व तोंडावर वार केले. या घटनेत सिंधूचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर घाबरलेल्या प्रमोदने तिथून पळ काढला.
सिंधूच्या हत्येनंतर त्यांचे वडील रामकुंवर यादव यांनी रौनापार ठाण्यात याबाबबत सूचना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. त्यानुसार, त्याला अटक केली आहे व पुढील कारवाई सुरू आहे.
गोव्याच्या किनाऱ्यावर लग्न करण्याचं स्वप्न बघताय; मग तुमच्यासाठी महत्त्वाची आहे
मध्य प्रदेशातील सिहारमध्येही असाच एक प्रकार घडला आहे. पत्ता विचारणाऱ्या व्यक्तीची डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केल्याचे समोर आले आहे. तसंच, मयत व्यक्तीच्या शरिराचे सात तुकडे केले. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी ही मानसिक रुग्ण आहे. मृतदेहाचे सात तुकडे केल्यानंतर आरोपी पुलाजवळ जाऊन बसला होता. पोलिसांनी त्याला याच ठिकाणाहून अटक केली आहे. सुरेंद्र कुशवाह असं आरोपीचे नाव असून तो ४० वर्षांचा आहे. तर, मरण पावलेल्या व्यक्तीची ओळख सुरज कुशवाह अशी पटली आहे.