Crime News : हिंदु धर्मांच्या पुराणामधील कंस मामा सर्वांनाच माहित आहे. मात्र आताच्या कलियुगामध्ये कंसपेक्षाही क्रूर मामा आहेत. एका मामाने 7 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केला होता. त्यानंतर कोर्टाने जवळपास 10 वर्षांनी पीडितेला न्याय देत आरोपी मामाला 9 वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मोमीन असं आरोपी मामाचं नाव आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
25 ऑक्टोबर 2013 ला गाझियाबादच्या मुरादनगर भागात मामाने भाचीवर बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडली होती. आरोपी मामाने आपल्या 7 वर्षांच्या भाचीवर बलात्कार केला होता, त्यानंतर पॉक्सो कोर्टात केस सुरू होती. मुराद नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीडित बालिका आपल्या मैत्रिणींसोबत खेळत होती. आरोपी मामाने त्यांना खेळताना पाहिलं त्यानंतर तो तिथे गेला. भाचीला गोड बोलून तो बाजूला घेऊन गेला. बोलत बोलत त्याने तिला जंगलात नेलं आणि पीडितेवर बलात्कार केला.
गाझियाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता. त्यानंतर ही सुनावणी पॉक्सो न्यायालयात सुरू होती. अखेर 9 वर्षांनंतर आता पॉक्सो न्यायालयाने नराधम मामाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्यासोबतच आरोपीला पन्नास हजारांचा दंडही भरायला लावला लावला आहे.