बकऱ्याच्या कानावर आलाय हा शब्द, किंमत पोहोचली ६० लाखांवर

राजस्थानच्या एका गावात सहा हजाराला खरेदी केलेल्या एका बकऱ्याची किंमत अचानक ६० लाखांवर पोहोचलीये. या मागचे कारण आहे बकऱ्याच्या कानावर आलेला शब्द. 

Updated: Mar 17, 2018, 11:01 AM IST
बकऱ्याच्या कानावर आलाय हा शब्द, किंमत पोहोचली ६० लाखांवर title=

मुंबई : राजस्थानच्या एका गावात सहा हजाराला खरेदी केलेल्या एका बकऱ्याची किंमत अचानक ६० लाखांवर पोहोचलीये. या मागचे कारण आहे बकऱ्याच्या कानावर आलेला शब्द. 

बकऱ्याच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, बकऱ्याच्या कानावर शब्द उमटल्यानंतर या बकऱ्याची किंमत सतत वाढतच आहे. लोक या बकऱ्याला लाखो रुपये खर्च करुनही विकत घ्यायला तयार आहेत. दरम्यान, या बकऱ्याला विकण्याचा विचार अद्याप त्याच्या मालकाने केलेला नाहीये.

बकऱ्याच्या कानावर लिहिलाय उर्दू शब्द

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कंवरपुरा तहसील रायसिंगनगरमधील आहे. येथील २७ एफएफचे निवासी हरप्रीत सिंग हॅप्पी यांनी काही दिवसांपूर्वी एक बकरा सहा हजार रुपयांना खरेदी केला होता. त्यावेळी बकऱ्याची प्रकृती पाहून सहा हजार रुपयांना खरेदी केले होते. काही दिवस आधी अचानक बकऱ्याच्या कानावर अल्लाह हे शब्द केले. 

ही गोष्ट जशी गावात पसरली आणि दुसऱ्याच दिवशी बकऱ्याची खरेदी करण्यासाठी गर्दी उसळली. काही लोक तर बकऱ्याला पाहण्यासाठी आले होते. 

goat, allah, rajasthan, बकरा, अल्लाह, राजस्थान

२० दिवसांत झाली ६० लाख रुपये किंमत

हॅप्पी यांनी सांगितले, अवघ्या २० दिवसांत ६००० रुपयांच्या किंमतीच्या बकऱ्याची किंमत ६० लाखापर्यंत पोहोचली. हल्ली तर बकऱ्याला पाहायला लोकांची रांग लागते. काही व्यापारी तर या बकऱ्याला खरेदी करण्यासाठी ६० लाखाहून अधिक रुपये द्यायलाही तयार आहेत. दरम्यान हॅप्पी यांचा बकऱ्याला विकण्याचा कोणताही विचार नाहीये.