जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर विभूती शंकर ढौंडियाल यांची पत्नी नितिका कौल भारतीय सैन्यात दाखल झाली आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर ती आता 'लेफ्टनंट नितिका ढौंडियाल' बनली आहे. नितिकाने आज पहिल्यादाच भारतीय सैन्याचा गणवेश परिधान केला. त्यानंतर तिने शहीद मेजर विभूती शंकर ढौंडियाल यांना म्हणजेच आपल्या शहीद पतीला श्रद्धांजली वाहिली आहे. मेजर विभूती ढौंडियाल हे फेब्रुवारी 2019 मध्ये जैश-ए-मोहम्मद (JeM) या आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले होते.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा चकमकीत मेजर ढौंडियाल, यांना 18 फेब्रुवारी 2019 रोजी, वीरगती प्राप्त झाली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावर आतंकवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 40 सैनिक शहीद झाले. या हल्ल्यानंतरच पुलवामाच्या पिंगलान गावात ठेका धरुन बसलेल्या आतंकवाद्यांना ठार मारण्यासाठी भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सुरु झाले. त्यानेतर पिंगलानमध्ये आतंकवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत चार भारतीय सैनिक ठार झाले. आणि या शहीद झालेल्या जवानांमद्ये मेजर रँक अधिकारी विभूती ढौंडियाल देखील होते.
मेजर ढौंडिया आणि नितिकाच्या लग्नाला 10 महिनेच पू्र्ण झाले होते आणि एप्रिल 2019 मध्ये दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार होता. परंतु त्या आधीच ढौंडियाल शहीद झाले. आपल्या पतीला शूर सैनिक म्हणत नितीका कौल म्हणाली की, तिला विश्वास आहे की, तिच्या पतीचे हे शौर्य आणखी लोकांना सैन्यात सामील होण्यास प्रेरित करेल.
मेजर विभूती शंकर ढौंडियाल शहीद झाल्यानंतर त्यांचे पार्थिव जेव्हा त्यांच्या गावी पोहचले, तेव्हा त्यांची पत्नी नितिकाला त्यांच्या या कार्या आणि शौर्याबद्दल खूप गर्व झाला. तिने मेजर ढौंडियाल यांच्या मृतदेहाजवळ उभे राहून त्यांना सलाम केला आणि ती म्हणाली, "तुम्ही माझ्याशी खोटं बोललात की, तुम्ही माझ्यावर प्रेम करता. तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त आपल्या देशावर प्रेम करत आणि मला याचा अभिमान आहे." माध्यमांशी बोलताना नितिका म्हणाली की, ती बिचारी व्यक्ती नाही, तर ती एका शूर शहीदाची पत्नी आहे आणि तिला तिच्या पतीच्या अभिमान आहे.
Lt Nitika Kaul gives befitting tribute to her husband #MajVibhutiShankarDhoundiyal, SC(P) who made supreme sacrifice at #Pulwama 2019; As she dons the Olive Green #IndianArmy uniform. A proud moment as #LtGenYKJoshi, #ArmyCdrNC pips the stars on shoulders & welcomes her to #AOC pic.twitter.com/Hg9NQlJtjT
— NorthernComd.IA (@NorthernComd_IA) May 29, 2021
नितिकाने ज्या प्रकारे आपल्या शूर पतीला ओलसर डोळ्यांनी 'जय हिंद' बोलून अंतिम निरोप दिला, त्यानंतर ती सर्वांची आदर्श बनली होती. 30 वर्षीय नितिकाने गेल्या वर्षी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) ची परीक्षा दिली होती. त्यानंतर तिला सैन्यात दाखल केले गेले होते. आता ती देखील सैन्याच्या अधिकार्याप्रमाणे गणवेश परिधान करून शत्रूंविरूद्ध लढायला सज्ज झाली आहे.