महाराष्ट्रात झालं तसंच राजकारण बिहारमध्ये घडलं; नितीश कुमार यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

बिहारमध्ये जेडीयु-भाजप सरकार स्थापन झाले आहे. नितीश कुमार यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

Updated: Jan 28, 2024, 05:26 PM IST
महाराष्ट्रात झालं तसंच राजकारण बिहारमध्ये घडलं; नितीश कुमार यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ  title=

Bihar Political Crisis : बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. जसं राजकारण महाराष्ट्रात झालं तसंच सेम टू सेम बिहारमध्ये घडलं आहे. राजीनामा दिल्यानंर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राज्यपालांकडे भाजपसोबत नव्यानं सत्ता स्थापन करण्याचा दावा केलाा. नितीश कुमार यांनी 9व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये राजकीय घडोमोडींना वेग आला. भाजपनं बिहारमधील आमदारांची बैठक घेऊन नितीश कुमारांसह सत्ता स्थापन करण्याची तयारी दर्शवली. सत्ता स्थापनेसाठी भाजपनं जेडीयूला समर्थन दिलं. भाजप आमदारांच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची विधिमंडळ पक्षनेते पदी तर विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आलीये. या दोघांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. 

इंडिया आघाडीतून नितीश कुमार बाहेर पडल्यानं आम्हाला फरक पडत नाही असा दावा संजय राऊतांनी केला आहे. अयोध्येत राम आहे तर बिहारमध्ये पलटूराम आहे अशी टीका त्यांनी नितीश कुमारांवर केली.