'तिकीट नव्हते, टीसी म्हणाला 'चल माझ्यासोबत' आणि दिव्यांग महिलेची अब्रुचं...

टीसीने दिव्यांग महिलेसोबत जे काय केलं त्याने संपूर्ण राज्य हादरलं. 

Updated: Jun 6, 2022, 10:28 PM IST
'तिकीट नव्हते, टीसी म्हणाला 'चल माझ्यासोबत' आणि दिव्यांग महिलेची अब्रुचं...  title=

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशमध्ये तिकीट नसल्याच्या कारणावरून एका टीसीने दिव्यांग महिला प्रवाशावर बलात्कार केल्याची घटना घडलीय. या घटनेने संपूर्ण मध्यप्रदेश हादरला आहे. या प्रकरणी दिव्यांग महिलेच्या तक्रारीवरून जीआरपीने सोमवारी आरोपी टीसीविरुद्ध कलम ३७६, ३६३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

जीआरपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांग महिला आणि तिचा पती शनिवारी गुना येथून सागरकडे निघाले होते. महिलेचे मामा सागरच्या मक्रोनिया येथे राहतात. त्यांच्याच घरी जाण्यासाठी गुणा स्टेशनवरून भागलपूर एक्सप्रेसने ते जात होते. यावेळी 
पतीने दिव्यांग महिलेला ट्रेनमध्ये बसवून तिकीट काढयला निघाला. 

पती तिकीट काढून येईपर्यंत ट्रेन सुटली. आणि दिव्यांग महिला एकटीच त्या ट्रेनने पुढे निघाली. रात्री 8.15 वाजता ही महिला सागर येथे पोहोचली. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उतरताच ड्युटी करत असलेले टीसी राजुलाल मीना यांनी महिलेकडे तिकीट मागितले. महिलेने तिकीट नसल्याचे सांगत तिचा पती गुना स्टेशनवर मागे तिकीटासोबत राहिल्याची माहिती दिली. 

मात्र टीसीने महिलेला, तुमचे चलान कापले जाईल, माझ्यासोबत मोठ्या साहेबांकडे या, अन्यथा एफआयआर होईल. अशा स्थितीत भीतीपोटी महिला टीसीसोबत गेली. आरोपी टीसी तिला कार्यालयात नेण्याऐवजी रेल्वे क्वार्टरमध्ये घेऊन गेला, जिथे त्याने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला आणि तेथून पळ काढला.  

या प्रकरणी रविवारी महिलेने पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवरून कँट पोलिसांनी प्रकरण जीआरपीकडे वर्ग केले. सोमवारी जबलपूरहून सागर येथे पोहोचलेले निरीक्षक शशी दुबे यांनी महिलेचे जबाब नोंदवून कलम ३७६, ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.