कोरोनाशी असं धैर्याने लढायचंय... जगवण्यासाठी अशी धडपड कधी पाहिली नसेल

कोरोना महामारीच्या युगात, देशात अनेक गंभीर समस्या आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे, तर दुसरीकडे रूग्णालयात बेड, औषध आणि ऑक्सिजनची कमतरता आहे.

Updated: Apr 22, 2021, 06:15 PM IST
कोरोनाशी असं धैर्याने लढायचंय... जगवण्यासाठी अशी धडपड कधी पाहिली नसेल title=

भोपाळ : कोरोना महामारीच्या युगात, देशात अनेक गंभीर समस्या आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे, तर दुसरीकडे रूग्णालयात बेड, औषध आणि ऑक्सिजनची कमतरता आहे. कोरोना व्हायरसच्या जलग संसर्ग वेगासमोर देशातील प्रत्येक राज्य असहाय्य दिसत आहे. राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणा कुठेतरी कमी पडत आहे.

मध्य प्रदेशातही कोरोनाच्या वेगाने वाढणार्‍या संसर्गामुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे. अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे राज्यातील सर्व सरकारी व खासगी आरोग्य यंत्रणा कोलमडताना दिसत आहेत. रुग्णांसाठी रुग्णवाहिकासुद्धा मिळू शकत नाही इतकी वाईट अवस्था झाली आहे. यातच उज्जैन कडून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला हातगाडीवर ठेऊन तिला दवाखान्यात नेले आहे.

त्यात आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या व्यक्तीला हातात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन चालत जावे लागले. असे सांगितले जात आहे की, महिलेची तब्येत बिघडल्यावर नातेवाईकांनी प्रथम रुग्णवाहिका बोलविली पण रुग्णवाहिका वेळेत येऊ शकली नाही. थोड्या वेळाने त्या महिलेची प्रकृती आणखी बिघडली त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्या महिलेला ताबडतोब एका हातगाडीवर ठेऊन रुग्णालयात नेण्यात आले.

जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी धडपड

या महिलेला हात गाडीवरुन ऑक्सिजन लावून घेऊन जाताना जितक्याही व्यक्तीने पाहिले त्यांना आश्चर्य वाटले. या दृष्यांमुळे सर्व लोकांसमोर सार्वजनिक दावे आणि कमजोर आरोग्य व्यवस्था उघडकीस आली.

कोरोना मध्य प्रदेशात झपाट्याने पसरत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 13 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत राज्यात 4 लाख 46 हजार 811 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.