...म्हणून करुणानिधींनी प्रेयसीला लग्नासाठी दिला होता नकार!

...याचमुळे त्यांनी आपल्या प्रेयसीसोबत विवाह नाकारला

Updated: Aug 8, 2018, 02:25 PM IST
...म्हणून करुणानिधींनी प्रेयसीला लग्नासाठी दिला होता नकार! title=

मुंबई : डीएमके प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचं आता निधन झालंय... करुणानिधी यांच्यावर धर्म कट्टरतेचाही आरोप अनेकदा केला गेलाय. याच कट्टरतेपोटी करुणानिधींनी आपल्या प्रेयसीला लग्नासाठी नकार दिला होता... हे लग्न तुटण्याचं कारण ठरलं होतं मंगळसूत्र... 

अधिक वाचा - एम करुणानिधी यांना मुखाग्नी नाही तर दफन केलं जाईल, का ते जा

हिंदू पद्धतीच्या एखाद्या विवाहामध्ये प्रमुख प्रतिकांमधलं एक म्हणजे मंगळसूत्र... परंतु, द्रविडी नेते करुणानिधी यांना परंपरेनुसार चालत आलेल्या चालीरितींमध्ये काहीही रस नव्हता... याचमुळे त्यांनी आपल्या प्रेयसीसोबत विवाह नाकारला.

अधिक वाचा : ...म्हणून करुणानिधींनी प्रेयसीला लग्नासाठी दिला होता नकार!

द्रविडी आंदोलन मुख्यरुपात ब्राह्मण्यवाद आणि हिंदी भाषेच्या विरोधात उभं राहिलं... ब्राह्मण्यवादाच्या विरोधाच्या स्वरुपात द्रविड आंदोलनाच्या नेत्यांनी हिंदू धर्मातील मान्यता धुडकावून लावल्या... त्यामुळे या आंदोलनाचे नेते नास्तिक राहिले... त्यांनी सैद्धांतिक रुपात देव आणि हिंदू धर्माशी निगडीत समान प्रतिकांना मानण्यास नकार दिला. त्याऐवजी त्यांनी निसर्ग आणि मानवतावादावर जोर दिला. करुणानिधीही याच रस्त्यावर वाटचाल करत होते. 

अधिक वाचा : ... म्हणून करूणानिधी नेहमी काळा चष्मा घालायचे !

१९४४ मध्ये करुणानिधी प्रेमात पडले होते... परंतु, तरुणीच्या कुटुंबीयांचा मात्र परंपरागत पद्धतीनं विवाह व्हावा, असा हट्ट होता. परंतु, करुणानिधी यांना मात्र मंत्रोच्चार, सात फेरे, मंगळसूत्र यांचा तिटकारा होता. त्यामुळेच त्यांनी प्रेयसीला लग्नासाठी नकार दिला. 

अधिक वाचा : जगाचा निरोप घेताना किती संपत्ती मागे सोडून गेलेत करुणानिधी, जाणून घ्या...

या घटनेनंतर करुणानिधी यांची प्रेयसी आयुष्यभर अविवाहीत राहिली. करुणानिधी यांनी मात्र तीन विवाह केले... त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं 'पद्मावती'... त्या सध्या हयात नाहीत... तर त्यांची दुसऱ्या पत्नीचं नाव दयालु अम्मल आणि तिसऱ्या पत्नीचं नाव राजथी अम्मल आहे.