लुसी विल्स गरोदर महिलांसाठी वरदान, डूलडलद्वारे मानवंदना

 गरोदर महिलांसाठी वरदान ठरलेल्या इंग्लंडच्या लुसी विल्स यांची 131 वी जयंती. 

Updated: May 10, 2019, 04:10 PM IST
लुसी विल्स गरोदर महिलांसाठी वरदान, डूलडलद्वारे मानवंदना  title=

मुंबई : गरोदर महिलांसाठी वरदान ठरलेल्या इंग्लंडच्या लुसी विल्स यांची 131 वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डूलडलद्वारे त्यांना मानवंदना दिली आहे. गर्भवती होताना महिलांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. या समस्येचे निराकरण लुसी विल्स यांच्या संशोधनाने केले आहे. त्यामुळे त्या जगातील सर्व महिलांसाठी एक देवदूत ठरल्या आहेत हे म्हणने वावगे ठरणार नाही. लुसी विल्स यांचा जन्म 10 मे 1888 साली झाला होता. लुसी विल्स या बिमेचोलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध होत्या.
 
१९११ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून बॉटनी आणि जिओलॉजी विषयातून पदवी प्राप्त केली. त्या संशोधनासाठी भारतात आल्या आणि मुंबईतील कापड गिरणीत काम करणाऱ्या गरोदर महिलांच्या अॅनेमियाची तपासणी केली. गरोदरपणात महिलांना होणाऱ्या आजारांचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, ते यशस्वी देखील झाले. उंदीर व माकडांवर केलेल्या त्यांच्या प्रयोगाला यश आले. 

त्यानंतर लुसी विल्स यांच्या प्रयोगाचा वापर जगातील सर्व गरोदर महिलांवर करण्यात आला. काही कालावधीनंतर या प्रयोगाला विल्स फॅक्टर म्हणून ओळखले जाऊ लागले.  

लुसी विल्स यांनी त्यांचा जन्म महिलांच्या आरोग्यासाठी वाहुन घेतला. १६ एप्रिल १९६४ रोजी लुसी यांनी अखेरचा श्वास घेतला.