नवी दिल्ली : भारत- चीन सीमेनजीक असणाऱ्या नाभिधांग नामक प्रतिबंधित क्षेत्रात एक महिला सध्या वास्तव्यास आहे. सध्या राहत असणारं स्थान सोडण्यास या महिलेनं नकार देत आपण देवी पार्वतीचं रुप असल्याचा दावा केला आहे. कैलास पर्वतावर राहणाऱ्या भगवान शंकराशी आपण लग्न करणार असल्याचंही तिचं म्हणणं आहे. प्रशासनाची ताकडदही या महिलेला त्या भागातून बाहेर काढण्यास अपयशी ठरत आहे. प्राथमिक माहिचीनुसार ही महिला मूळची लखनऊची असल्याचं सांगण्यात येत आहे.
बळजबरी केल्यास आत्महत्या करण्याची धमकी
प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या हरमिंदर कौर नामक या महिलेनं रितसर परवानगी घेत ती 15 दिवसांसाठी या भागात गेली होती. पण, ती तिथंच राहू लाली आणि आता हे स्थान सोडण्यास सपशेल नकार देत आहे.
पिथौरागढ़चे एसपी लोकेंद्र सिंह यांनी सांगितल्यानुसार या महिलेल्या सदर क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांची पथकंही पाठवण्यात आली होती. पण, त्यांच्या हातीही निराशाच आली. बळजबरी केल्यास आपण आयुष्य संपवू अशी धमकी ही महिला देत आहे. (Lucknow Woman Wants To Marry Lord Shiv now living on India China Border Claims To Be Goddess Parvati)
आता नव्यानं पोलीस पथक या भागात जाणार आहे, या पथकामध्ये पोलिसांची संख्या जास्त असेल. महिलेनं या क्षेत्रातून निण्यास नकार दिल्यास तिला नाईलाजानं धारचूला येथे पाठवण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशातील अलीगंज येथे राहणाऱ्या या महिलेनं एसडीएम धारचूला येथून 15 दिवसांची परवानगी घेत ती गुंजी इथं गेली होती. पण, 25 मे रोजी ही परवानगी संपूनही प्रतिबंधीत क्षेत्रातून परतलीच नाही. गुंजी हे कैलास मानसरोवरच्या वाटेत येणारं एक ठिकाण. दरम्यान, अनेकांच्या म्हणण्यानुसार महिलेचं मानसिक आरोग्य ढासळलं आहे, कारण ती वारंवार आपण पार्वती असल्याचा दावा करत आहे. इतकंच नव्हे, तर कैलासावर जाऊन शंकराशी लग्न करणार असल्याचंही ती म्हणत आहे.