Husband Wife Fighting and Jump From Balcony : नवरा बायकोचं भांडण ही अगदीच सामान्य गोष्ट आहे. दोघांमधला वाद विकोपाला गेला तरी अनेकदा ते शेवटी एकत्र येतात. कित्येक भांडण कोर्टाच्या दारात जातात पण तिथेही ती सोडवली जातात आणि सर्व काही पूर्वीसारखं होतं. पण उत्तर प्रदेशात दोघांच्या भांडणात पत्नीला जीव गमवावा लागलाय.
पत्नीही मागे गेली आणि...
उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये पती पतीचा वाद हा इतका टोकाला गेला की पत्नीला जीव गमवावा लागला. भाडणानंतर रागाच्या भरात पतीने छतावरुन उडी मारली. त्याला वाचवण्यासाठी पत्नीनेही त्याच्या मागे उडी मारली. मात्र पती वाचला आणि पत्नीचा मृत्यू झाला. पोलिसांसमोरच हा सर्व प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दारु प्यायल्यामुळे कडाक्याचे भांडण
लखनऊच्या अमीनाबाद परिसरात हा सर्व प्रकार घडलाय. पती 8 डिसेंबर रोजी दारुच्या नशेत घरी आला होता. यावरुनच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वाद वाढल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. काही वेळाने पोलीस दाखल झाले आणि त्यांनी दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला.
पतीवर रुग्णालयात उपचार
पतीने यानंतर छताच्या दिशेने धाव घेतली आणि पोलिसांसमोरच उडी मारली. त्याला वाचवयला गेलेल्या पत्नीनेही मागून उडी मारली. दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पत्नीचा मृत्यू झाला होता. तर पतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, याआधी सुद्धा दोघांमध्ये अनेकवेळा भांडणे होत होती. मात्र गुरुवारी दुपारपासून दोघांमध्ये भांडण सुरु होते असे शेजाऱ्यांनी सांगितले. मात्र स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीने त्याला पकडून ठेवले होते. मात्र पत्नीचा पाय अडकला आणि ती खाली पडली.