LPG Cylinder गॅस बुकिंगवर मिळेल हा आश्चर्यकारक फायदा

बुकिंग करा आणि मिळवा इतकी सवलत  

Updated: Jan 18, 2022, 09:35 PM IST
LPG Cylinder गॅस बुकिंगवर मिळेल हा आश्चर्यकारक फायदा title=

मुंबई : वाढत्या महागाईच्या काळात LPG ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आहे. या ऑफरद्वारे LPG सिलिंडरच्या बुकिंगवर थोडी थोडकी नाही तर फार मोठी सवलतीसोबत आणखी बरेच फायदे मिळणार आहेत. ही सवलत आणि फायदे मिळविण्यासाठी काय करावे लागेल हे जाणून घेऊ..    

यासाठी तुम्हाला फक्त 'Paytm' द्वारे गॅस बुक करावा लागणार आहे. 'Paytm'ने 3 Pay 2700 Cashback Offer नावाची योजना सुरू केली आहे. 'Paytm' च्या विशेष ऑफर अंतर्गत एलपीजी सिलेंडर बुक केल्यास तब्बल 2,700 रुपयांचा फायदा मिळणार आहे. यासोबतच पेटीएमने एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगवर कॅशबॅक आणि अन्य बक्षिसे जाहीर केली आहेत.

'Paytm'चे नवीन वापरकर्ते यांनी पहिल्यांदा एलपीजी सिलिंडर बुक करून 'Paytm' द्वारे पेमेंट केले आहे त्या ग्राहकांनाच हा फायदा मिळणार आहे. या ग्राहकांना सलग तीन महिन्यांच्या पहिल्या बुकिंगवर 900 रुपयांपर्यंतचा खात्रीशीर कॅशबॅक मिळणार आहे. मात्र, या ऑफरमध्ये काही नियम आणि अटी आहेत.

याशिवाय, पेटीएमच्या विद्यमान ग्राहकांनाही प्रत्येक बुकिंगवर रिवॉर्ड्स, 5000 रुपयांचा कॅशबॅक पॉइंट्स, टॉप ब्रँड्सच्या गिफ्ट व्हाउचर अशी बक्षिसे मिळणार आहेत. 

विशेष म्हणजे, पेटीएमने आपल्या अॅपमध्ये एक नवीन फीचर जोडले आहे. ज्यामुळे एखाद्या ग्राहकाने सिलेंडर बुक केल्यानंतर डिलिव्हरी ट्रॅक करता येऊ शकेल. याशिवाय सिलेंडर भरण्याचे रिमाइंडरही फोनवर येईल. ही ऑफर इंडेन (Indane), HP गॅस (HP Gas) आणि भारतगॅस (BharatGas) या तिन्ही सिलिंडर बुकिंगवर लागू आहे. 

असा मिळेल कॅशबॅक
प्रथम पेटीएम अॅप डाउनलोड करा.
यानंतर सिलेंडर बुकिंगवर जाऊन भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस यापैकी योग्य पर्याय निवडा.  
तुमचा नोंदणीकृत क्रमांक किंवा LPG आयडी किंवा ग्राहक क्रमांक लिहा.  
शेवटी Proceed चा पर्याय निवडून पेमेंट करायचे आहे.