फ्री फायर खेळताना जुळलं दोघांंचं सुत, प्रेमात आडवे आले बाबा, असा रचला कट

तिचं त्याच्यावर जडलं प्रेम, प्रेमात आडवे आलेत बाबा; मग रचला कट आणि...

Updated: Oct 1, 2022, 04:42 PM IST
फ्री फायर खेळताना जुळलं दोघांंचं सुत, प्रेमात आडवे आले बाबा, असा रचला कट title=

Crime News : कलियुगामध्ये नात्यांची परवा केली जाणार नाही असं म्हटलं होतं. अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत ज्यामध्ये भावाने बहिणीवर बलात्कार, प्रॉपर्टीच्या वादावरून सख्ख्या भावाची हत्या केली होती. अशातच बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. (Marathi Crime News) वडिलांनी मुलीच्या प्रेम प्रकरणाला नकार दिल्याने तिने केलेल्या कृत्याने मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एका अल्पवयीन मुलीने प्रियकरासह वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. (Love Marriage a minor daughter attacked father in ghaziabad Free Fire Game News)

नक्की काय आहे प्रकरण?
22 सप्टेंबर रोजी गाझियाबादच्या वैशाली सेक्टर 4 मध्ये अनिल सक्सेना नावाच्या व्यक्तीचा मृतदेह घरात आढळून आला होता. मात्र पोलीस तपासामध्ये जे समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. पोटच्या पोरीने आपल्याच बापाला संपवलं होतं. आरोपी मुलगी ही अल्पवयीन आहे. 

अल्पवयीन मुलगी ही मोबाईलवर फ्री फायर गेम खेळायची, गेम खेळता खेळता तिची एका मुलासोबत मैत्री होते. त्यानंतर दोघांनी एकमेकांना आपला इन्स्टाग्राम आयडी दिला. दोघे त्यावर बोलू लागले दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. दोघेही लग्न करण्याचं ठरवतात.  मात्र मुलीच्या वडिलांनी नकार दिला होता. 

असा रचला कट-
Boyfriendचे वय जास्त होतं, मुलीने तिच्या बॉयफ्रेंडला घरी बोलावलं होतं. मात्र वडिलांनी नकार दिल्याने दोघांनी मिळून गळा आवळून खून केला.  इतकंच नाहीतर दोघेही हत्या करून महाराष्ट्रातील जळगावमध्ये पळून आले होते. मात्र पोलिसांना फार काही काळ चकवा देऊ शकले नाहीत. आरोपी बॉयफ्रेंड राहुलला अटक केली आहे तर अल्पवयीन मुलीला सुधारणागृहात पाठवण्यात आले आहे.