Loksabha Election 2024 : पंतप्रधानांनी सांगितली होरपळवणाळऱ्या उन्हाळ्यात मतदानासाठी घराबाहेर पडण्याची उत्तम वेळ

Loksabha Election 2024 : तापमान ओलांडणार 44 अंशांचा आकडा. होरपळवणाऱ्या उन्हाळ्यामध्ये मतदानाचा दिवस नेमका कसा पार पडणार?   

सायली पाटील | Updated: Apr 18, 2024, 03:03 PM IST
Loksabha Election 2024 : पंतप्रधानांनी सांगितली होरपळवणाळऱ्या उन्हाळ्यात मतदानासाठी घराबाहेर पडण्याची उत्तम वेळ  title=
loksabha Election 2024 IMD Weather updates pm modi appeals voters to visit poll booth in morning time

Loksabha Election 2024 : देशातील बहुतांश भागांमध्ये हवामानानं आता रंग बदलले असून, उन्हाळा अधिक तीव्र होताना दिसत आहे. दिवसा असणाऱ्या तापमानाचा परिणाम रात्री उशिरापर्यंत दिसत असून, आता अनेक भागांमध्ये तापमान 43 ते 44 अंशांच्याही पलिकडे जाताना दिसत आहे. याच उकाड्याची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिल्यामुळं नागरिकांना असणारा उष्माघाताचा धोका पाहता आरोग्य यंत्रणासुद्धा आता सतर्क झाल्या आहेत. (Weather Update)

सध्ययाच्या घडीला देशाच्या पूर्व आणि दक्षिणेकडील भागावर सूर्याचा प्रकोप पाहायला मिळत असून आता अवघ्या काही तासां वर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसंदर्भातही चिंता व्यक्त केली जात आहे. सहसा निवडणूक आयोगाकडून अनेक निकषांच्या आधारे मतदानाच्या तारखा निर्धारित केल्या जातात. पण, देशातील सद्यस्थिती पाहता हा वाढता उन्हाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चिंतेतही भर टाकताना दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वीच (PM Modi) पंतप्रधान मोदींनी एक उच्चस्तरिय बैठक बोलवली होती, ज्यानंतर त्यांनी काही प्रचारसभांमध्ये मतदारांना या उकाड्यातही मतदानासाठी येण्याचं आवाहन केलं आहे. 'उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण अडचणीत आहे पण, ही निवडणूक आपल्या देशाच्या दृष्टीनं अतिशय. महत्त्वाची असून, मी मतदारांना आवाहन करतो की, त्यांनी सकाळी लवकर जाऊन मतदान करावं', असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी मतदानासाठीची योग्य वेळ जाहीरपणे सांगितली. 

हेसुद्धा वाचा : 'या' मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अनंत अंबानीनं एका झटक्यात 5,00,00,000 रुपये केले दान 

देशात उन्हाची तीव्रता सहन होईना... 

(Heatwave Predictions) बुधवारी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद राजकोट येथे करण्यात आली. इथं 43.8 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. आयएमडीनं दिलेल्या इशाऱ्यानुसार आता देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये तापमान 2 ते 3 अंशांनी वाढताना दिसत असून, पुढचे पाच दिवस देशात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. येत्या काळात बंगाल, ओडिशा, झारखंड, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूसह इतरही काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळं दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. इतकंच नव्हे तर, वाढत्या उकाड्यामुळं काही भागांमध्ये शाळा, कार्यालयंही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.