देशाचे रक्षकच गोंधळाची परिस्थिती निर्माण करत आहेत- जया बच्चन

एका प्रचारसभेत प्रचारसभेत सहभागी झाल्या होत्या.   

Updated: May 1, 2019, 09:39 AM IST
देशाचे रक्षकच गोंधळाची परिस्थिती निर्माण करत आहेत- जया बच्चन  title=
छाया सौजन्य- एएनआय

लखनऊ :  loksabha election 2019  समाजवादी पक्ष नेत्या जया बच्चन यांनीही लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला असल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी एका प्रचारसभेमध्ये जनतेला संबोधित करत त्यांना नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदर भूमिकांवर टीका केली. समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत असणाऱ्या पूनम सिन्हा यांच्यासाठी त्या प्रचारसभेत सहभागी झाल्या होत्या. 

'सुरक्षा रक्षकाची जबाबदारी अतिशय महत्त्वाची असते. पण, सध्याचं एकंदर वातावरण पाहता घडीला जी व्यक्ती देशाच्या संरक्षार्थ जबाबदार आहे तीच व्यक्ती देशात गोंधळ आणि अव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करत आहे', असं म्हणत जया बच्चन यांनी नाव न घेता मोदींवर टीका केली. प्रत्येक मतदार संघातील कार्यकर्त्यांची भूमिका ही गरजेची आणि तितकीच महत्त्वाची असल्याचंही त्या म्हणाल्या. 

पूनम सिन्हा यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच सर्व मतादांनाही आपलंसं करत त्यांना भरघोस मतांधिक्याने विजयी करावं अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. 'नव्या जोमाच्या उमेदवारांचं मोठ्या मनाने आपलंसं करत त्यांच्या यशाची हमी देणं ही समाजवादी पक्षाची परंपराच आहे. कोणत्याही भागातीत, प्रांतातील उमेदवार असो, तुम्ही या पक्षाचाच एक भाग आहात आणि तुमचं रक्षण करणं हाच आमचा ध्यास असल्याचं सांगत त्यांनी पक्षाची भूमिका अधोरेखित केली. 

'तुम्ही मला पूनम सिन्हा यांच्या यशाची हमी द्या, नाहीतर त्या मला मुंबईत प्रवेशही देणार नाहीत', असं म्हणत आपल्या ४० वर्षांच्या मैत्रीचा उल्लेख करत त्यांनी प्रचारसभेत विनोदी रंग आणण्याचा प्रयत्न केला. सध्या सुरु असणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या टप्प्यात मतदारांनी मोठ्या संख्येने पुढे येत त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला निवडून आणावं असं आवाहन त्यांनी या प्रचारसभेदरम्यान उपस्थित जनतेला केलं. 

उत्तर प्रदेशमध्ये सपा, बसपा आणि आरएलडी यांच्या युतीतर्फे समाजवादी पक्ष ३७, बसपा ३८ आणि आरएलडी ३ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. ६ मे रोजी त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, २३ मे रोजी निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत.