loksabha election 2019 VIDEO : जिल्हाधिकारीच वाहतात निवडणुकांचं ओझं....

या महिला अधिकाऱ्याचं सर्वच स्तरांतून कौतुक 

Updated: Apr 21, 2019, 01:06 PM IST
loksabha election 2019 VIDEO : जिल्हाधिकारीच वाहतात निवडणुकांचं ओझं....  title=

तिरुवअनंतपूरम : loksabha election 2019 लोकसभा निवडणूकांच्या वातावरणाला दर दिवशी एक वेगळा रंग चढत आहे. एकिकडे उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरू असतानाच दुसरीकडे मात्र अधिकारी आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणा या लोकशाहीच्या उत्सवासाठी टप्प्याटप्प्याने सज्ज होत आहेत. तयारी करत आहेत लोकशाहीच्या या जागराची. सोशल मीडियावर सध्या निवडणुकांच्याच या माहोलातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मतदान प्रक्रियेसाठी आलेल्या यंत्रणांच्या पेट्या वाहनातून उतरवण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे. 

Kerala केरळमध्ये २३ तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार असून, आतापासूनच तेथे या खास दिवसाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ पाहता याचा सहज अंदाज लावता येत आहे. ज्यामध्ये केरळच्या थ्रिसूर येथील जिल्हाधिकारी टी.वी. अनुपमा या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मतदान प्रक्रियेसाठी आलेल्या सामानाच्या अवजड पेट्या वाहनातून उतरवताना दिसत आहेत. त्यामुळे एका अर्थी जिल्हाधिकारीच या निवडणुकांचं ओझं वाहत आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

(व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा)

 https://www.facebook.com/100009448181202/videos/2336768816648035/

हा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल झाला असून, तो अनेकांनी शेअर केला आहे. अनेकदा अधिकारी आपल्या पदाचं स्थान पाहून कनिष्ठ आणि वरिष्ठांनी करायची कामं विभागात. पण, असे अनेक कर्तव्यनिष्ठ अधिकारीही सेवेत रुजू आहेत ज्यांच्यासाठी काम, मग ते कोणत्याही स्वरुपातील असो.